वजनमापे निरीक्षकाला 32 हजारांची लाच घेतांना अटक

जळगाव लाचलुचपत विभागाची कारवाई; रावेरातील घटना
वजनमापे निरीक्षकाला 32 हजारांची लाच घेतांना
अटक

रावेर Raver|प्रतिनिधी

पेट्रोल पंपाशी (petrol pump) संबंधित स्टॅम्पिंग प्रमाणपत्र (Stamping certificate) देण्यासाठी माप निरीक्षकाला (Inspector of Measurements) ३२ हजार रूपयांची लाच (accepting bribes)घेतांना रंगेहात पकडल्याचा (Caught red-handed) प्रकार समोर आला आहे. यात वजनमापे निरीक्षकाला अटक करण्यात आली असून जळगाव लाचलुचपत विभागाने (Jalgaon Bribery Department) ही कारवाई केली आहे.सुनिल रामदास खैरनार (वय ५६) रा. एसएमआयटी कॉलेज, जळगाव असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “ तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवाशी असून त्यांनी रावेर येथे ११ महिन्यांच्या करारावर पेट्रोलपंप भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. या पेट्रोल पंपाच्या ४ झोनल मशीन स्टॅम्पिंग करून सदर स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त रावेर येथील वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक सुनिल खैरनार याने ३२ हजाराची मागणी केली.

त्यानुसार जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ३२ हजाराची लाच स्विकारतांना निरीक्षक सुनिल खैरनार ला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पो.नि. संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी,किशोर महाजन, बाळु मराठे, सुनिल वानखेडे, पोकॉ महेश सोमवंशी, पोकॉ ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com