नदीपात्रात कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करा

जनआंदोलन खान्देश विभागातर्फे जिल्ह्याधिकार्‍यांना निवेदन
नदीपात्रात कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव येथील नदीपात्रातील कचर्‍याची साफसफाई न करता कचरा जाळण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. त्यामुळे या कचर्‍यांना कायस्वरुपी विलेवाट लावण्याासाठी बंदोबस्त करुन, नदीपात्रात कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी येथील जन आंदोलन खान्देश विभागातर्फे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन देखील जन आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी यांना इमेलव्दारे पाठविण्यात आले आहे.

या निवेदन म्हटले आहे की, चाळीसगाव येथील नदीपात्रातील कचर्‍याची साफसफाई न करता अज्ञात व्यक्तीच्या वतीने कचरा जाळण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार्‍या भाजीमंडई लगत असलेल्या महाले बुट हाऊस लगत असलेल्या नदीपात्रात परिसरातील व्यवसायिक व रस्ते व गटारी सफाई नंतर जमा करण्यात आलेला कचरा नगरपालिका कर्मचारी टाकत असल्याने कचर्‍याचे ढीग जमा झाले आहे.

मान्सूनपूर्व नदीपात्राची साफसफाई आवश्यक असतांना नगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने नदीपात्रातील कचरा काढला जात नाही उलट कचर्याचे ढीग सकाळी व संध्याकाळी जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. या बाबत तक्रार केल्यानंतर आरोग्य विभागातर्फे थातूरमातूर कार्यवाही केली जाते. नदीपात्रातून काढण्यात आलेला कचर्‍याची योग्यरित्या विल्हेवाट न लावता तो कचरा नदी पात्रात पसरविण्यात येतो कालातंराने पुन्हा तेथे कचर्‍याचे ढीग जमा झालेले दिसून येतो.

त्यामुळे समस्या जैसे थै राहते त्यामुळे या समस्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नदीपात्रात कचरा टाकला जाऊ नये म्हणून नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, त्याचप्रमाणे मान्सूनपूर्व या नदीपात्राची नियमित साफसफाई व कचरा जाळून निर्माण होणारे वायू प्रदूषण टाळण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य कार्यवाही करून नदीपात्रात कचरा टाकणार्‍यावर योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश चाळीसगाव नगरपालिका प्रशासनला देण्यात यावे. या निवेदनावर जन आंदोलन खान्देश विभागाचे प्रा.गौतम निकम, डॉ एस.एम.लंवाडे, डॉ.वाडिलाल चव्हाण, शत्रुघ्न नेतकर, विजय शर्मा, योगेश्वर राठोड, आबा गुजर बोरसे, नाशीर भाई शेख, मिलिंद अशोक भालेराव, गणेश भोई, प्रदीप चौधरी, अशोक राठोड, विजय चौधरी, आर.के.पाटील, भावराव गांगुर्डे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.