मिटर रिडींग एजन्सीवर कारवाई करा

वीज देयकांना विलंब : महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे प्रा.पाटील यांची मागणी
मिटर रिडींग एजन्सीवर कारवाई करा

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

महावितरण कंपनीच्या (Maha distribution company) मनमानी कारभाराचा (arbitrary administration) त्रास (trouble) तालुक्यासह शहरातील वीज ग्राहकांना होत आहे. बहुतांश वीज ग्राहकांना (Electricity consumers) ऑक्टोबर 2022 ची वीज देयक मिळाली नाहीत तर काही ग्राहकांना नेहमी अंतिम देयक (Electricity payment) दिनांकानंतर येत आहेत. परिणामी, वेळेत बिल घरी न आल्याने ग्राहकांना वारंवार नाहक अतिरिक्त दंड भरावा लागत आहे. वीज वितरण कार्यालयाकडून त्यांच्या तक्रारीची (complaint) दखलही घेतली (not even taken) जात नाही. यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत. आता लगेचच नोव्हेंबर - 2022 ची देयके येतील. दोन महिन्यांची देयके एकदाच अदा करतांना नागरिकांची दमछाक होणार आहे. शहरात वेळेत मीटर रिडींग न (Not taking meter readings)घेणार्‍या तसेच विज देयके वाटप न करणार्‍या संबंधित एजन्सीवर (agency) कारवाई (action) करण्याची मागणी प्रा. धिरज पाटील यांनी मुख्य अभियंत्याकडे केली आहे.

विज ग्राहकांना भुर्दंड

वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणार्‍या वीज देयकावर देयक दिनांक टाकण्यात येतो. हा देयक दिनांक म्हणजे ज्या वेळी वीज बिल सिस्टीममध्ये तयार होते ती तारीख असते. साधारण या तारखेच्या दहा दिवसांमध्ये ग्राहकांच्या घरी वीज बिल येणे अपेक्षित असते. अंतिम देयक दिनांकापासून बिल भरण्याची अंतिम तारीख घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वेगवेगळी असते. परंतु तोपर्यंतही अनेक ग्राहकांकडे वीज बिल पोहोचत नसल्याने ग्राहकांना दंडाची रक्कम भरावी लागते. दंडाची रक्कम वीज देयकाच्या रकमेवरून ठरते. दहा रुपयांपासून पुढे कित्येक रुपये दंड आकारला जातो. परिणामी, वीज बिल वितरक ठेकेदाराने घरी वीज बिल उशिरा आणल्याने कोणतीही चूक नसताना वीजग्राहकांना दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

मिटर रिडींग एजन्सीवर कारवाई करा
श्री नटेश्वर व रंगभूमी पूजनाने बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

जेष्ठ नागरिकांना त्रास

अनेक ग्राहकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. तर काही जेष्ठ नागरिकांना वीज देयकासाठी महावितरणच्या दोन मजली कार्यालयात जावे लागते. वय जास्त असल्याने फेर्‍या मारतांना त्रास होतो अश्या अनेक तक्रारी जेष्ठ नागरिकांनी केल्या आहेत. महावितरण कंपनीने वीज देयक वितरित करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी अरेरावीची भाषा करतात.

मिटर रिडींग एजन्सीवर कारवाई करा
नंदुरबारात 20 नोव्हेंबरला घुमर महोत्सव

काही ग्राहकांची अशी तक्रार आहे की मुद्दामहून त्यांना उशिरा बिल दिले जाते. असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांमध्ये वीज वितरण कंपनीबाबत प्रचंड राग व असंतोष निर्माण झाला असून या सर्व बाबींवर योग्य कारवाई न केल्यास तालुक्यातील वीज ग्राहक महावितरणविरोधात लवकरच आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.

मिटर रिडींग एजन्सीवर कारवाई करा
विखरणच्या यात्रेत दोन गट परस्परांना भिडलेत

महावितरण अधिकारी, ठेकेदार व ग्राहकांची एक संयुक्त बैठक लावावी, नागरिकांना होणार्‍या अडचणी यात मांडल्या जातील. सोबत खरंच ठेकेदार योग्य काम करीत आहे की नाही हे ही समोर येईल. महावितरणच्या अधिकार्‍यांनी ठेकेदारांना याबाबतीत सूचना करावी असे आवाहन ही प्रा.पाटील यांनी केले आहे.

मिटर रिडींग एजन्सीवर कारवाई करा
शेतकर्‍याची साडे आठ लाखात फसवणूक, एकावर गुन्हा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com