जामनेरच्या सौ.श्रद्धा पुराणिक यांना स्वर लता मंगेशकर पुरस्कार

जामनेरच्या सौ.श्रद्धा पुराणिक यांना स्वर लता मंगेशकर पुरस्कार

तळेगाव Talegaon ता. जामनेर / वार्ताहर

जामनेर (Jamner) येथील न्यू इंग्लिश स्कूल (New English School) च्या उपशिक्षिका श्रद्धा पुराणिक (Shraddha Puranik) ( कुलकर्णी) यांना मूळजी जेठा महाविद्यालय ( m j college) व इव्हेंट मॅनेजमेंट विभागातर्फे स्वर लता मंगेशकर पुरस्काराने (Swar Lata Mangeshkar Award) सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

20 मार्च रोजी भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर (Bharat Ratna Swar Kokila Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजलीपर गीतांचा कार्यक्रम जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता . यावेळी ज्या महिलांनी संगीत क्षेत्रात (field of music) उत्तम असे काम केले आहे अनेकांना घडविले आहे अशा महिलांना विशेष आमंत्रित करून त्या महिलांना स्वर लता मंगेशकर (Swar Lata Mangeshkar Award) 2022 या पुरस्काराने गौरवण्यात आले.

महाराष्ट्रातून जवळजवळ पाच महिलांचा याठिकाणी गुणगौरव करण्यात आला. त्यातील एक म्हणजे जामनेर येथील श्रद्धा पुराणिक (Shraddha Puranik) या होत. त्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये संगीत शिक्षिका (Music teacher) म्हणून कार्यरत असून उत्तम पसायदान गायीका म्हणून त्यांची ओळख आहे. सौ.पुराणिक यांची 2006 मध्ये देखील महाराष्ट्र संगीत रत्न (Maharashtra Sangeet Ratna) टॉप 3 मध्ये निवड झाली होती तसेच 2009 मधील सा-रे-ग-म-प या स्पर्धेत महाराष्ट्रातून त्या टॉप नऊ मध्ये निवडल्या गेल्या होत्या.

अलीकडेच त्यांची सह्याद्री वाहिनीवर गेस्ट आर्टिस्ट म्हणून त्यांना संधी मिळाली होती . तसेच जळगाव परिवर्तन संस्था व रंगकर्मी शंभू पाटील सर यांच्या सहकार्याने महाराष्ट्रभर बहिणाबाई संत कबीर (Bahinabai Sant Kabir) या संदर्भात अनेक कार्यक्रमांचे त्यांचे आयोजन असते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.ई तात्या पाटील हे होते.तसेच व्यासपीठावर शशिकांत वडोदकर ,जोशी बंधू ज्वेलर्सचे संचालक, माधवबाग हॉस्पिटल च्या डाँ .श्रद्धा माळी ,प्राचार्य.स.ना.भारंबे विनीत जोशी ,परिवर्तन चे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सांगता तुकाराम बीज दिन असल्याने प्रेक्षकांच्या विशेष आग्रहास्तव ""भेटी लागे जीवा लागलीसी आस"" या गीताने सौ.पुराणिक यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच शाळा स्तरावर देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका पी .एन .नरवाडे मॅडम पर्यवेक्षक व्ही. डी. पाटील सर, एम. पी. सावखेडकर यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचा गुणगौरव करण्यात आला.

यावेळी सर्व शिक्षक ,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .त्यांच्या संगीत क्षेत्रातील या कार्याबद्दल जामनेर येथील ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीपाद पेडगावकर तसेच प्रा. सुधीर साठे , विशाल कुळकर्णी ,अँड.सितेश साठे , यासह अनेक समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी संगीतप्रेमी यांनी पुराणिक /कुलकर्णी कुटुंबाचे कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com