स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ हे जगाचे मार्गदर्शकच !

सुवर्ण महोत्सवी वर्षात नूतन मराठा महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा व्याख्यानमाला
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ हे जगाचे  मार्गदर्शकच !

जळगाव jalgaon

स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) व राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) हे केवळ भारताचे मार्गदर्शक (India's guide) नसून समस्त जगाचे मार्गदर्शक (guides of the world) आहेत. आज घराघरात जिजाऊ च्या प्रतिमा पूजना सोबत त्यांच्या विचारांची अंमलबजावणी (Implementation of ideas) करणे गरजेचे आहे. तर युवकांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांची रुजवण (Rooting of thoughts) अधिक प्रभावी पणे करण्यासाठी आता पालक व शिक्षकांनी प्रयत्न करावे. असा सुर नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यान मालेच्या आजच्या दहाव्या दिवशी निघाला .

Nutan Martha college logo
Nutan Martha college logo

नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती या दरम्यान कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणारी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून अतिशय उत्साहात चाललेल्या या ज्ञानयज्ञाचा राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आज समारोप करण्यात आला.

प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांचे स्वागत उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले. प्रा. भाग्यश्री पाटील यांच्या गोड आवाजातील जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रारंभी उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख यांनी

तुला आळविता, स्फुरतात बाहू

हे राष्टमाते आई जिजाऊ..

हे जीजाबराव पाटील लिखित राजमाता जिजाऊ यांचे स्फुर्ती काव्य सादर केले.

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेची आजची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत असलेल्या प्रा. पल्लवी शिंपी यांनी 'मी राजमाता जिजाऊ बोलतेय' या वाक्याने केली. प्रा. पल्लवी शिंपी यांनी राजमाता जिजाऊंच्या भुमिकेत जाऊन जो संवाद साधला तो क्षण टीपण्यासारखा होता. बालपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या जिजाऊंचे बालपण ते वय वर्षे ८८ पर्यंतचे शहाणपण आणि तरुणपण त्यांच्या एकेका शब्दांत जाणवत होते. शिवबाची जडणघडण, त्या काळात सती न जाण्याचा घेतलेला निर्णय, शिवाजी महाराजांच्या सात विवाहामागील कुळ, फौजफाटा आणि वतनातील वृद्धीची संकल्पना, स्वप्नातील स्वराज्य सत्यात उतरेपर्यंत रोखून ठेवलेला श्र्वास, अठरापगड जातींचे संवर्धन, रयतेचे वालीत्व अशा अनेक अंगाणी त्याग आणि शौर्याने लढा देणारी जिजाऊमाता प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी करत प्रा. पल्लवी शिंपी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि जोशपूर्ण भाषणाचा समारोप केला.

याच कार्यक्रमा दरम्यान अंगात भगवा पायजमा कुडता, डोक्यावर फेटा अन कमरेला फटका बांधून " उठा तरुणांनो जागे व्हा अन् जोपर्यंत ध्येय्य प्राप्त होत नाही तोवर थांबू नका, नमस्कार "मी स्वामी विवेकानंद बोलतेय" अशी सुरुवात करत प्रा. जगदीश सोनवणे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

तरुणांनो माझी ओळख नुसती शिकागो येथील धर्मसभेतील भाषणा पुरती मर्यादीत नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक विचारांचा शोध घ्या, मी रामकृष्ण मिशन ची स्थापना यासाठी केली की, व्यक्तीला अभय देवून मानवतेची सेवा करावी, तुमच्यातील भीती आणि भय नरकाप्रमाणे असून ती मृत्यूचे कारण आहे, सामर्थ्य हेच खरे जीवन असून दुर्बलता हा मृत्यू आहे, दारिद्र्य आणि अज्ञान घालवणे हीच खरी देशसेवा आहे, युद्धात जिंकायचं असेल तर ढाल आणि तलवार आवश्यक आहे म्हणून तुम्ही इंग्रजी आणि संस्कृत भाषा शिकले पाहिजे. याचाच अर्थ असा की त्या काळात या प्रमुख दोन भाषिकांची या देशात सत्ता होती सत्तेच्या विरोधात लढायचं असेल तर त्या सत्ताधिशांची भाषा अवगत असणे गरजेचे आहे असे विवेकानंदाचे मौलिक विचारातून प्रा. जगदीश सोनवणे यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

प्रा. वंदना पाटील यांनी गेल्या दहा दिवसांतील अनुभव थोडक्यात कथन केले..

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी गेल्या दहा दिवसांपासून अतिशय उत्साहात साजरा झालेल्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.भुमिकेत गेल्याशिवाय व्यक्त होता येत नाही तुम्ही प्रत्येक कर्तबगार महिलांच्या भुमिकेत जाऊन व्यक्त झालात तुम्हा सगळ्यांचं मनपुर्वक अभिनंदन करत ते म्हणाले की, मुळातच महिलांमध्ये नवनिर्मितीची क्षमता असते तीला गरज असते फक्त योग्य वेळ आणि मार्गदर्शनाची.

अलिकडे बऱ्याच क्षेत्रात, खेळ, अंतरीक्ष, राजकारण, समाजकारण आणि अगदी सैन्यदलात देखील या कर्तृत्ववान महिलांनी आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे तुम्ही चालविलेली ही व्याख्यानमाला त्यात अजून काहीतरी भर घालायला नक्कीच मदत करेल यात शंका नाही असं सांगून त्यांनी अध्यक्षीय समारोप केला.

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेत सावित्रीबाई फुले, महाराणी येसूबाई, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, झाशीची राणी, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक,कमला भसीन,पंडिता रमाबाई, बहिणाबाई चौधरी, डॉ. आनंदीबाई जोशी, मलाला युसुफजाई आणि फातिमा शेख अशा कर्तबगार महिलांच्या यशोगाथा सांगण्यात आल्या.

deshdoot logo
deshdoot logo

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पौर्णिमा देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. इंदिरा पाटील यांनी गेल्या दहा दिवसांपासून चाललेल्या या व्याख्यानमालेचा थोडक्यात आढावा घेत सगळयांचे आभार मानले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ .एन .जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड, संयोजिका डॉ. इंदिरा पाटील सर्व शाखेचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com