महापालिकेच्या मलेरिया विभागातील तिघांचे निलंबन

४१ कर्मचार्‍यांना बजाविल्या नोटीस ; शिस्तीची अंमलबजावणी
jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporation

जळगाव jalgaon :

महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) नवीन आयुक्तांनी कर्मचार्‍यांना शिस्त (Discipline to employees) लावण्यासाठी कामात कसुर करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई (Action) करण्यात येत आहे. दरम्यान बुधवारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांनी मलेरिया विभागातील तीन जणांचे निलंबन (Suspension) केले असून ४१ कर्मचार्‍यांना शोकॉज नोटीस (Showcase notice) बजाविल्या आहेत.

jalgaon  Municipal Corporation Commissioner Dr. Vidya Gaikwad
jalgaon Municipal Corporation Commissioner Dr. Vidya Gaikwad

महापालिकेच्या नवीन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडून कामचुकारपणा (Volunteerism) करत बाहेर हिंडणार्‍या कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी (Discipline to employees) अचानक कर्मचार्‍यांचे हजेरीबुक मागविण्यात येत आहे. दिवसातून केव्हाही दोन वेळेस हजेरीबुक ताब्यात घेण्यात येत असून ड्युटीवर असताना गायब होणार्‍या कर्मचार्‍यांना नोटीसा (Showcase notice) बजाविण्यात येत आहेत.

पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर बसून उशिरा येणार्‍यांची चांगलीच हजेरी घेतली होती. त्यानंतर देखील अधून मधून अचानक हजेरी बुक (Attendance book) मागविण्यात येत आहेत. त्यामुळे कामावर हजेरी लावून गायब होणार्‍या कर्मचार्‍यांवर वचक निर्माण झाला आहे.

असे असतांना बुधवारी डॉ. विद्या गायकवाड यांनी अचानक सकाळी ६ वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मलेरिया विभाग, पाणी पुरवठा युनिट व बांधकाम युनिटला भेट देवून तेथील कर्मचार्‍यांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान हजेरी मस्टरवर (Attendance book) तफावत आढळून आल्या असून काही लोक हजेरी लावलेली असतांना गायब होते.

तसेच काही लोकांकडून आपली जबाबदारी पार पाडली जात नसल्यामुळे मलेरीया विभागातील ३ जणांचे निलंबन (Suspension) करण्यात आले. यामध्ये मलेरिया विभागातील आरोग्य पर्यवेक्षक व दोन मंजुरांचा सामावेश आहे. तसेच मलेरिया विभाग प्रमुख यांचे आपल्या विभागातील कर्मचार्‍यांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून इतर विविध विभागातील ४१ कर्मचार्‍यांना देखील नोटीस (Showcase notice) बजाविण्यात आल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com