
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
डॉ. विद्या गायकवाड (Dr. Vidya Gaikwad) यांची राज्यशासनाने तडकाफडकी आदेश काढून आयुक्तपदावरून (post of Commissioner) कार्यमुक्त केले होते. या आदेशावर त्यांनी मॅटमध्ये धाव घेत नूतन आयुक्त देविदास पवार (New Commissioner Devidas Pawar) यांची नियुक्ती आदेशाला मॅटने (Matt) स्थगिती (adjournment) दिली होती. याबाबत आज ‘मॅट’ मध्ये आयुक्त देविदास पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले असून पुढील कामकाज 5 जानेवारी 2023 ला होणार आहे.
राज्यशासनाने डॉ. विद्या गायकवाड यांची आयुक्तांवर कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले होते. त्यांच्या जागी परभणीचे देविदास पवार यांची जळगाव मनपा आयुक्तपदी बदलीचे आदेश काढले होते. यावर डॉ. गायकवाड यांनी मॅट मध्ये धाव घेत आयुक्तपदाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली होती. याबाबत 9 डिसेंबरला कामकाज झाले होते. यावेळी राज्यशासनाकडून त्यांची बाजू तसेच प्रतिज्ञापत्र मॅटपुढे सादर केले तर आयुक्त देविदास पवार यांनी पुरेसा वेळ न मिळाल्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली होती.
आज झालेल्या कामकाजेत आयुक्त पवार यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याबाबत ‘मॅट’ने पुढील कामकाज 5 जानेवारीला ठेवले आहे. डॉ गायकवाड या मॅट मधे जावून त्यांनी विविध मुद्यांवरून झालेल्या बदलीबाबत तक्रार केली होती. त्यानुसार मॅटने या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली होती. आयुक्त पवार यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याची वेळ दिली होती. आज आयुक्तांकडून प्रतिज्ञापत्र जरी सादर झाले असले तरी मॅटने 5 जानेवारीला पुढील सुनावणी ठेवली आहे.