चोरीच्या लॅपटॉसह संशयित जेरबंद

जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल ; बसस्थानकावरुन लांबविली होती बॅग
चोरीच्या लॅपटॉसह संशयित जेरबंद

जळगाव - jalgaon

शहरातील नवीन बसस्थानकातून (Bus station) नांदेड येथील प्रवाशांची (Passenger) लॅपटॉपसह (laptop) बॅग लांबविणार्‍या संशतियास (Suspicious) रविवारी जिल्हापेठ पोलिसांनी (District Peth Police) जळगाव लोहमार्ग पोलिसांच्या (Jalgaon Railway Police) सतर्कतेने जळगाव रेल्वे स्थानकावरुन (Railway station) अटक केली आहे. बब्बू भय्यालाल धुर्वे वय ३९ रा उमरखेडा खुर्द ता.जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून लॅपटॉपसह बॅग हस्तगत करण्यात आली आहे.

अमळनेर येथील जिशान अशपाक पिंजारी हा तरुण शिक्षणाकामी नांदेड येथे वास्तव्यास आहेत. जिशान हे शनिवारी अमळनेर येथे जाण्यासाठी नांदेड येथून प्रवास करीत जळगाव बसस्थानकावर आले. जिशान यांच्याकडे एक लॅपटॉप असलेली बॅग तसेच इतर ३ अशा चार बॅगा होत्या.यादरम्यान त्यांची लॅपटॉप असलेली बॅग चोरीस गेली.

सर्वत्र शोध घेवूनही बॅग न मिळाल्याने जिशान हे अमळनेरला निघून गेले. यादरम्यान रविवारी जळगाव रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिस स्टेशनच्या पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार राजेश पुराणिक व पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील या कर्मचार्‍यांनी संशयास्पद हालचालींवरुन एका जणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे लॅपटॉप असलेली बॅग मिळून आली. बॅग बाबत संशयित उडवाउडवीचे उत्तरे देत होता.

अधिकच्या चौकशीत बब्बू भय्यालाल धुर्वे असे संशयिताचे नाव असल्याचे समोर आले. त्याने बॅग बसस्थानकावरुन चोरल्याची कबूली दिल्याने रेल्वे पोलिसांनी प्रकार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कळविला. त्यानुसार पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जुबेर तडवी, साहेबराव खैरनार यांनी रेल्वे पोलिसांकडून संशयित बब्बू धुर्वे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लॅपटॉपच्या बॅगही हस्तगत करत शनिवारी पोलिसांनी बॅगचे मूळ मालक जिशान पिंजारी यांना संपर्क साधून लॅपटॉपसह बॅग त्याच्या स्वाधीन केली. याप्रकरणी संशयिताविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com