
रावेर|प्रतिनिधी raver
रावेर पीपल्स बँकेचे चेअरमन सोपान पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागी सूर्यभान चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया संपन्न झाली.
यावेळी व्हाॅ.चेअरमन बिसन सपकाळ,सोपान पाटील,डॉ.राजेंद्र पाटील,ज्ञानेश्वर महाजन,प्रल्हाद महाजन,संजय वाणी,पंकज महाजन,ऍड.प्रवीण पासपोहे,ऍड विपीन गडे, दिलीप पाटील उपस्थित होते.तर निवड प्रक्रियेसाठी बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले.निवडीनंतर सूर्यभान चौधरी यांचे अभिनंदन माजी नगराध्यक्ष दारामोहम्मद,राजीव पाटील,यादवराव पाटील,डी सी पाटील,विश्वनाथ गायकवाड,पी.आर.पाटील,कैलास वाणी,डी.एन.महाजन,सुरेश पाटील यांनी केले.