सुप्रिम इंडस्ट्रीज उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन; साडेतीन महिन्यांत येणार पूर्णत्वास
सुप्रिम इंडस्ट्रीज उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागर पार्कवर सुप्रिम फाऊंडेशनच्या सीएसआर अंतर्गत अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे.

दरम्यान,महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन झाले. येत्या साडेतीन महिन्यांत हे काम पूर्णत्वास येणार आहे.

यावेळी सुप्रिम इंडस्ट्रीजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संजय प्रभुदेसाई, जी.के. सक्सेना, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त पवन पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे, बंटी जोशी, कैलास सोनवणे, प्रशांत नाईक, अ‍ॅड.शुचिता हाडा, दीपमाला काळे, सरिता माळी-कोल्हे, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, शहर अभियंता अरविंद भोसले उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक नितीन बरडे व बंटी जोशी या दोघांच्या पुढाकाराने व विशेष पाठपुराव्याने या कार्याला सुरुवात झाली आहे.

यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सुप्रिममचे आभार मानत जळगाव शहराला दात्यांची परंपरा नेहमीच राहिलेली असून, वेळोवेळी दानशूर व्यक्तींसोबत महापालिका समाजोभिमुख कार्य करण्यास तत्पर असते, असेही सांगितले.तसेच माजी महापौर नितीन लढ्ढा यांनीही मनोगत व्यक्त केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com