शेतकरी आंदोलनास वीज कर्मचार्‍यांसह विविध संघटनांचा पाठिंबा

शेतकरी आंदोलनास वीज कर्मचार्‍यांसह विविध संघटनांचा पाठिंबा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

केंद्र सरकारच्या कृषी कायदा विधेयक पाशवी बहुमताच्या बळावर पारित करून शेतकरी विरोधी धोरणे राबविली जात असल्याने देशपातळीवर शेतकरी संघटना नी दिल्ली येथे प्रचंड धरणे आंदोलन सुरू केले असून शेतकरी संघटना नी आपल्या आंदोलन मध्ये वीज कायदा 2020 या विधेयकाला सुध्दा विरोध दर्शविला आहे.

त्याच्या समर्थर्ना देश पातळीवरील वीज कामगार संघटना आयटक संलग्न महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे महावितरण परिमंडळ कार्यालय समोर द्वारसभा घेत निषेध नोंदविण्यात आला.

शेतकरी व सर्वसामान्य माणूस उध्द्वस्त करण्यात येणारं षडयंत्र रचले जात आहे असे मांडले. सदर आंदोलन मधील शेतकरी संघटना नी वीज उद्योगांचे खाजगीकरण व फ्रैंचाईसी करण करून सार्वजनिक उद्योग विक्री करून भांडवलशाही ला प्रोत्साहन देणारा कायदा रद्द करण्याची तरतूद करण्यासाठी आपल्या मागण्यां मध्ये समावेश केला.

त्यामुळे समर्थन म्हणून ह्या द्वार सभा घेऊन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी संघटनेचे परिमंडळ सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील, कॉ.मुकेश बारी, कॉ.प्रकाश कोळी, कॉ.दिनेश बडगुजर, कॉ.प्रभाकर महाजन, कॉ.निलेश भोसले, कॉ.मंगेश बोरसे, कॉ.एफ.एम.मोरे, कॉ.हेमंत राठोड, कॉ.किशोर जगताप, कॉ.देवेंद्र भालेराव, कॉ.गणेश शेंडे, कॉ.अनिल धोबी आदी उपस्थित होते.

सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन

भाजपाकृत केन्द्र शासनाकडून शेतकरी हितविरोधी कृषी विधेयके पाशवी बहुमताच्या बळावर पारीत करीत मंजूर करण्यात आली.

या विधेयकामुळे शेतकरी कामगारवर्गासह असंघटीत मजूर देखिल देशोधडीला लागणार आहे. या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जळगाव येथील सैयद नियाजअली भैया फाउंडेशनतर्फे पाठींबा देत निदर्शने करण्यात आली.

यावेळी सै. अयाज अली नियाज अली, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, दिनेश लखारा, सुरज गुप्ता, शफि ठेकेदार, सय्यद उमर, मुकेश परदेशी, शेख सलीम उद्दीन, मोहम्मद खान, इलियास नूरी, सय्यद इरफान, शेख शाकिब, मो. फारूक तेली, शेख वसीम, शेख नजीर उद्दीन, सय्यद ओवेश अली, शेख नदीम, शेख नूर मोहम्मद, सय्यद अता ए मोइन आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कृषक समाज

दिल्ली येथे पंजाब व हरियाणातील शेतकर्‍यांचे केेन्द्र शासनविरोधात आंदोलन सुरू आहे. केन्द्र शासनाने पारीत केलेलेे कृषि विधेयके हे शेतकरी विरोधात असल्याचे सांगीतले जात असून शेतकरी विधेयके शेतकरी हिताचे असून कृषी उत्पन्न बाजार पेठांसह खाजगी ठिकाणी शेती माल विक्रीसाठी भावांतर योजना सर्वासांठी लागू केन्द्र सरकारने अध्यादेश काढून दिलासा द्यावा.

अशी मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी फॅक्सव्दारे केली आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन संदर्भात तीन ते चारवेळा बैठक होउन सुद्धाकाही मार्ग निघू शकलेला नाही.

यासंदर्भांत भावांतर योजनेची वैशिष्ठे संदर्भात अध्यादेश काढण्यात यावा असे म्हटले आहे. या निवेदनावर भारत कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर, डॉ.रमेश ठाकरे, वसंतराव महाजन, जगतराव पाटील, शेषराव पाटील.गोविंद रोकडे आदींच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com