
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील (Bhaichand Hirachand Raisoni Patsanstha) अपहाराच्या (embezzlement) प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (Shikrapur) येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरचा (main suspect Sunil Zanwar) अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) अर्ज पुणे न्यायालयाने (Pune Court) फेटाळून (Rejected) लावला आहे.
बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात संतोष काशिनाथ कांबळे (वय 57, रा. लोहगाव, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन प्रकाश वाणी, सुनिल झंवर, महावीर जैन, अजय राठी, विवेक ठाकरे, अजय ललवाणी, उदय कांकरीया व धरम साखला यांच्यावर दाखल झाला गुन्हा झाला होता. दरम्यान, कंडारे याची कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांचे पैसे परत करण्याची जबाबदारी असताना त्याने सुरेश जैन, राजेश जैन व इतर पदाधिकार्यांमार्फत ठेवीदारांकडे माणसे पाठवून ठेवींच्या पावत्या 20-30 टक्के रकमेत प्रतिज्ञापत्रासह लिहुन घेऊन पुढील तक्रार देऊ नये यासाठी सरकारी पदाचा गैरवापर केला. खोटी कागदपत्रे तयार करुन फायद्यासाठी अपहार, फसवणूक केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
या गुन्ह्यात संशतिय सुनील झंवर याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने झंवरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. दरम्यान, याआधी 20 ऑक्टोंबरला डेक्कनच्या गुन्ह्यातही झंवरचा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळून लावलेला आहे. तर आता शिक्रापूरच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याची माहिती विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे. अॅड. प्रविण चव्हाण यांनी सुनील झंवरच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता.