सुनील झंवर हे माझेच नाहीतर सर्व पक्षीय नेत्यांचे निकटवर्तीय

चौकशीत काय ते समोर येईलच, आमदार गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण
सुनील झंवर हे माझेच नाहीतर सर्व पक्षीय नेत्यांचे निकटवर्तीय

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

बीएचआर घोटाळ्यातील In the BHR scam मुख्य संशयित सुनील झंवर The main suspect is Sunil Zanwar यास पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने Pune Economic Crimes Branch अटक केली आहे. झंवर गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय असून त्याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहेत. तर दुसरीकडे सुनील झंवर हे माझेच नाहीतर सर्व पक्षीय नेत्यांचे निकटवर्तीय असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन Former Minister and MLA Girish Mahajanयांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

कायद्यानुसार जे असेल ते होईल

भाजपतर्फे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली. कायद्यानुसार जे असेल ते होईल, अनेक लोकांना बीएचआर घोटाळ्याप्रकरणी अटक झाली आहे.

पोलीस यंत्रणा त्याची चौकशी करतय, त्यातून आहे ते निष्पन्न होणारच आहे. यात चांगल, वाईट हा प्रश्नच नाहीये. सुनील झंवर यांचे माझ्याशी जेवढे संबंध आहे. तेवढे सर्व पक्षाच्या नेत्यांशी झंवरचे संबंध असल्याचेही यावेळी आमदार गिरीश महाजन म्हणाले. तर झंवर याचे संबंध नाही, असे कुणी मला सांगून दाखवावे, असे आव्हानही महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com