उन्हाचा त्रास होऊ न देता होणार आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव

उन्हाचा त्रास होऊ न देता होणार आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव
Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University

जळगाव jalgaon |प्रतिनिधी|

शहादा Sahada येथे १९ ते २३ एप्रिल या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary of North Maharashtra University) आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात (Inter-College Youth Festival) सहभागी होणाऱ्या कलावंत विद्यार्थ्यांना (Artist students) उन्हाचा त्रास (sun Hits troubles) होवू नये याची पूर्ण दक्षता घेवून महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याचे आयोजन समितीच्या (Organizing committee) बैठकीत सांगण्यात आले.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी (Vice-Chancellor. V.L. Maheshwari) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजन समितीची बैठक झाली या बैठकीत शहादा येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र (Pujya Sane Guruji Vidya Prasarak Mandal's Pharmacology) तसेच कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (College of Arts, Science and Commerce) येथे आयोजित युवारंग युवक महोत्सवाच्या (Yuvarang Youth Festival) पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. उन्हाची तिव्रता लक्षात घेवून कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. याची माहिती आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर.एस. पाटील आणि डॉ. सुनील पवार यांनी दिली. आयोजन समितीच्या सदस्यांनी यावर सविस्तर चर्चाकरून सूचना केल्या.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्टेजवर कुलरची व्यवस्था, वैद्यकीय पथक, सुरक्षा, तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्लुकोज (ओ.आर.एस.) व्यवस्था करण्यात येणार आहे. दि. १९ एप्रिल रोजी दुपारी काढण्यात येणारी शोभायात्रा (Shobha Yatra) उन्हाची तिव्रता लक्षात घेवून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दु. १२ ते ४ या वेळेस खुल्या रंगमंचावर (open stage) स्पर्धा होणार नाहीत.

वेळापत्रकात नव्याने बदल करून सकाळी लवकर स्पर्धा सुरू होतील. २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उद्घाटन करण्याचा निर्णयही याबैठकीत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी हा महोत्सव घेतला जाणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी (Health care) घेतली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी बैठकीत मार्गदर्शन करतांना सर्वांच्या सहकार्याने महोत्सव यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

या बैठकीस प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी इंगळे, व्य.प. सदस्य दिलीप पाटील, कार्याध्यक्ष दीपक पाटील,प्रभारी कुलसचिव प्रा. के.एफ. पवार, प्राचार्य आर.एस. पाटील, डॉ. सुनील पवार, अधिसभा सदस्य प्राचार्य ए.टी. पाटील, डॉ. सुनील गोसावी, नितीन ठाकुर, अमोल मराठे, अमोल सोनवणे, प्रा. प्रकाश अहिरराव, प्रा. ई.जी. नेहेते, डॉ. के.जी. कोल्हे तसेच डॉ. पवन पाटील, डॉ. राम पेठारे, प्रा. अजय पाटील, प्रा. सुनील कुंवर , कोकीला पाटील, श्रीराम दाऊतखाने, डॉ. मालिनी आढाव, डॉ. अनिल साळुंखे, डॉ. ईश्वर जाधव आदी उपस्थित होते. शेवटी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.