विवरा येथील तरुणाची पाच वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या

विवरा येथील तरुणाची पाच वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या

फैजपूर येथील आराधना कॉलनीमधील घटना

रावेर|प्रतिनिधी-विवरे raver

विवरे खुर्द येथील विवाहित तरुणाने ५ वर्षाच्या मुलासह फ़ैजपूर येथील घरी (Suicide) आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १२.२५ वा. घडली. याबाबत फैजपूर (police) पोलिसात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

विवरा येथील तरुणाची पाच वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या
कारसह पावणे पाच लाखांचा पानमसाला जप्त

येथील निलेश घनश्याम बखाल (वय-३६)हा व्यवसायानिमित्त फ़ैजपुर येथील आराधना कॉलनीत पत्नी व मुलगा आर्यनसह राहत होता, शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास पत्नीला किराणा मॉल मध्ये सोडून, घरी ५ वर्षीय आर्यनला गळफास देऊन, स्वतः देखील आत्महत्या केल्याची घटना घडली.

मॉलमध्ये असलेली पत्नी कॉल करत होती, मात्र निलेशचा मोबाईल बंद येत असल्याने,घरी आल्यावर दरवाजा आतून लावलेला आढळुन आला,शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर धक्कादायक घटना दिसून आली, याबाबत मुलगा आर्यन याला डॉ खाचणे यांच्याकडे दाखल केले असता, डॉक्टरनी मृत घोषित केले, मुलगा आर्यन व वडील निलेश या दोन्हीवर यावल ग्रामीण येथे डॉ बी बी बारेला,डॉ तिडके यांनी शवविच्छेदन केले.या गुन्ह्याचा तपास फैजपूर पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर करत आहे. निलेश याने यावेळी सुसाईड नोट लिहलेली आढळून आली यात त्यांच्या मृत्यू बद्दल कुणालाही दोषी धरू नये, मुलगा आर्यन ला सोबत नेत असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.