भादली येथे परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

नशीराबाद पोलीस ठाण्यात नोंद
भादली येथे परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

जळगाव - Jalgaon

तालुक्यातील भादली (Bhadali) येथे अमिन बन्नेखॉं पठाण (वय २५) या परप्रांतीय तरुणाने भाडे करारावरील राहत असलेल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी रात्री ११ वाजेच्या सुमारास नशीराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तरुणाला रुग्णालयात हलविण्यासाठी कुणीही मदतीला पुढे आले नाही. अखेर रात्री साडनऊ वाजेच्या सुमारास भादली येथील पोलीस पाटील ॲड. राधीका ढाके यांनी (Nashirabad) नशीराबाद पोलिसांच्या (police) मदतीने तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

मूळ मध्यप्रदेशातील भोपाळ येथील रहिवासी अमिन बन्नेखॉं पठाण हा तरुण पाटचारीचे पाईप लाईनचे काम करणार्‍या कंपनीत मजूर म्हणून कामाला आहे. या कामानिमित्ताने तो एप्रिल महिन्यापासून भादली येथे योगेश रघुनाथ कोळी यांच्या घरात भाड्याने राहत होता. बुधवारी अमिन याची आई जरीना व वडील हे दोघे नातेवाईकांच्या भेटीसाठी मालेगाव येथे गेले होते. अमिन हा घरी एकटाच होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास अमिन याने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

Related Stories

No stories found.