Breaking News विश्रामजिन्सी येथील प्रेमीयुगलांची आत्महत्या

हम बने, तुम बने, एक दुजे के लिये.....विवाह करून संपवले जीवन
Breaking News विश्रामजिन्सी येथील प्रेमीयुगलांची आत्महत्या

रावेर|प्रतिनिधी raver

तालुक्यातील विश्राम जिन्सी येथे दोन प्रेमी युगलांनी (Loving couple) दि.२३ शनिवारी रोजी आत्महत्या (Suicide) करून जीवनयात्रा संपवली आहे. याघटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, (police) पोलीस कसून चौकशी करत आहे.

यातील युवक २३ वर्षीय व युवती १८ वर्षाची असून मुकेश गोकुळ पवार व गायत्री परशुराम पवार अशी दोघांची नांवे आहे.

दोघे शुक्रवारी रात्रीच घरातून बेपता झाले होते.त्यांचा संपूर्ण रात्र नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतला होता, मात्र ते मिळून आले नव्हते.

अखेर शनिवारी सकाळी ८ वा.मुलाचे वडील गोकुळ पवार (पोलीस पाटील) यांच्या शेतात झाडाला एक दोर बांधून, त्यावर दोघांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. पोलीस पाटील गोकुळ यांनीच याबाबत रावेर पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव,विशाल सोनवणे व कर्मचारी घटनास्थळी ताफ्यासह हजर झाले.घटनास्थळी संपूर्ण गाव जमा झाले होते.

Related Stories

No stories found.