गोजार्‍याच्या शेतकर्‍याची आत्महत्या

घरात कोणी नसतांना घेतला गळफास
गोजार्‍याच्या शेतकर्‍याची आत्महत्या

सुनसगाव (Sunasgaon) , ता. भुसावळ (वार्ताहर) -

तालुक्यातील गोजोरे(Gojarya) येथील शेतकर्‍याने (farmer) गळफास घेऊन (Suicide) जिवनयात्रा संपविल्याची घटना १७ रोजी घडली. याबाबत तालुका पोलिसात(police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुका पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोजोरे येथील शेतकरी (farmer) संजय तुकाराम जावळे (वय ५५) यांनी आपल्या राहत्या घरात लोखंडी हुकाला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना दि १७ जून रोजी सकाळी १० वाजेपूर्वी घडली. घटनास्थळीतालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. विलास शेंडे, ठाणे अंमलदार युनूस शेख, हे. कॉ. दिपक जाधव, गणेश गव्हाळे, उमेश बारी यांनी धाव घेतली. शवविच्छेदन करण्यासाठी ट्रामा सेंटर भुसावळ येथे पाठविले.
मयत शेतकरी संजय जावळे यांचे कुटुंब नागपूर (Family ) येथे माहेरी गेले होते. त्यामुळे घरी ते एकटेच होते. विशेष म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीचा आज दहावीचा निकाल होता व ती उत्तिर्ण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलिसात राजेश विठोबा जावळे यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यू र.जि.२२/२०२२ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तपास पो हे कॉ गणेश गव्हाळे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com