खंडाळा येथील विवाहितेची आत्महत्या

खंडाळा येथील विवाहितेची आत्महत्या

पतीसह चार जणांना अटक तर चार पसार

भुसावळ Bhusaval। प्रतिनिधी

तालुक्यातील खंडाळा (Khandala) येथील सुनीता विजय पाटील (Sunita Vijay Patil) या 33 वर्षीय विवाहितेने (Married) सासरीच गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेपूर्वी घडली.

पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत. तसेच अन्य किरकोळ कारणावरून सासरचे लोक छळ करीत असल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार मयत विवाहितेच्या भावाने दिल्याने पतीसह आठ आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पतीसह, दिराणी व सासु-सासर्‍यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य चौघे पसार झाले आहेत.खंडाळा येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती कळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, सपोनि प्रकाश वानखेडे यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल- मयत सुनीता हिला आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयताचा भाऊ संदीप युवराज पाटील (वय 30, देवगाव, ता.चोपडा, ह.मु.सातपूर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी पती विजय बाळू पाटील, सासु अंजनाबाई बाळू पाटील, सासरे बाळू उखर्डू पाटील, दीर भागवत बाळू पाटील, दिराणी रोहिणी भागवत पाटील (सर्व रा.खंडाळा, ता.भुसावळ), मोठी नणंद भारती विनोद पाटील (जळगाव), लहान नणंद प्रतिभा संजय पाटील, लहान नंदोई संजय भास्कर पाटील (रा.देवगाव, ता.चोपडा) यांच्याविरोधात गु.र.नं.1/2022, भा.दं.वि. 306, 498अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी पतीसह दीर, सासु व सासरे यांना अटक करण्यात आली तर अन्य आरोपी पसार झाले आहेत. तपास सपोनि प्रकाश वानखेडे करीत आहेत. याप्रकरणी आरोपी पती विजय पाटील, सासु अंजनाबाई पाटील, सासरे बाळू उखर्डू पाटील, दिराणी रोहिणी भागवत पाटील यांना अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com