
बोदवड bodwad प्रतिनिधी :
बोदवड तालुक्यातील मनुर खुर्द येथे गणेश सुरेश सोनवणे(धनगर) या 31 वर्षीय तरुण शेतकऱ्याने (farmer) कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
गणेश सुरेश सोनवणे या शेतकऱ्याच्या नावे सहा एकर कोरडवाहू शेती आहे. त्यास लहान भाऊ योगेश सोनवणे असून यश आणि महेश अशी दोन मुले आहेत. त्याच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे तीन लाख रुपये, विविध बचत गटाचे एक लाख रुपये, आणि इतर खाजगी व्यक्तींकडून दीड लाख रुपये असे एकूण साडेपाच लाख रुपये कर्ज होते. या कर्ज बोजाचा ताण असह्य झाल्यामुळे गणेश सुरेश सोनवणे यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
गणेश सोनवणे यांना आठ वर्षीय यश नावाचा मुलगा असून दुसरा मुलगा पाच वर्षे वयाचा आहे पत्नीचे नाव सुरेखाबाई असून या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी गणेश सोनवणे यांच्यावर होती. यासंदर्भात प्रशासनाने त्यांना मदत करावी, अशी भावना मनूर खुर्द येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.