
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
शहरातील नेहरू नगरातील पूर्वा अमोल कोल्हे (वय- 43) या महिलेने (married woman) राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील नेहरू नगरात पूर्वा या पती व दोन मुलांसह वास्तव्यास होत्या. गुरूवारी पती व मुले घराच्या हॉलमध्ये झोपलेले होते. पूर्वा यांनी सायंकाळी घराच्या मागील खोलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचे पती अमोल यांना स्टूल पडल्याचा आवाज आल्यामुळे त्यांना जाग आली.
त्यांनी लागलीच मागच्या खोलीमध्ये जावून पाहिल्यानंतर त्यांना पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी लागलीच इतरांच्या मदतीने पत्नीला खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेले. याठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी महिलेला तपासणीअंती मृत घोषित केले. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.