प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

 प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आजारपणाला कंटाळून (Tired of illness) समता नगरात (Samata Nagar) राहणार्‍या भरत रमेश आंबेकर (वय-40) यांनी ओढणीने गळफास ( hanging) घेवून आत्महत्या (Suicide) केल्याचे घटना गुरुवारी दुपारीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (sudden death) नोंद करण्यात आली आहे.

शहरातील समता नगरातील वंजारी टेकडी येथे भरत आंबेकर हे वास्तव्यास असून ते सेंट्रींग काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. त्यांचे मुल शाळेत गेले होते तर त्यांची पत्नी कामाला गेल्या होत्या. अनेक दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, याच आजारपणाला कंटाळून गुरुवारी भरत यांनी राहत्या घरात गळफास छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. घराबाहेर बसलेले त्यांचे वडील घरात आले असता त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ सुशिल चौधरी, पोना प्रवीण जगदाळे व पोकॉ उमेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.

बुधवारीच उपचार घेवून परतले होते घरी

आंबेकर हे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते बुधवारीच घरी परतले होते. दरम्यान, आज त्यांनी आजारणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सविताबाई आणि कल्पेश व किरण हे दोन मुले तर एक विवाहित मुलगी व वडील असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com