
शरद बोदडे
मुक्ताईनगर : Muktainagar
आदिशक्ती संत मुक्ताई (Adishakti Saint Muktai) अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी(Antardhan Samadhi Saptashatkottar Silver Jubilee) (७२५ वे वर्ष) सोहळ्याची सांगता (Concludes) सोमवारी सकाळी प्रक्षाळ पुजेने (prakshal pooja) करण्यात आली. पौराहित्य विनायक महाराज व्यवहारे, राम जूनारे, संकेत महाराज निपाणेकर(कोथळी) यांनी केले.
संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा नुकताच दि.२५ मे २०२२ रोजी पांडूरंग परमात्मा (पंढरपूर) , रुक्मिणी माता (कौडीण्यपुर) , संत नामदेव महाराज (पंढरपुर) , संत निवृत्तीदादा(त्र्यंबकेश्वर) पालखी सोहळे व जळगांव , धुळे , नाशिक ,बुलढाणा, अकोला तसेच विदर्भातील इतर असंख्य जिल्हे व मध्यप्रदेशातील असे लाखो भाविक व वारकऱ्यांचे (Warkari)उपस्थितीत संपन्न झाला.
ह्या वर्ष भरातील कालात हजारो भाविकांनी मुक्ताई चे दर्शन घेतले. महोत्सव दरम्यान आईसाहेबांचे नित्यउपचार बंद असतात. त्यामुळे वारीनंतर प्रत्येक देवस्थान वर प्रक्षाळ पुजा (prakshal pooja) केली जाते. यानुसार आदिशक्ती मुक्ताई ची प्रक्षाळपूजा संस्थान चे अध्यक्ष ॲड रविंद्रभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज करण्यात आली. यावेळी संपूर्ण गाभारा स्वच्छता करून , मंदिर पाणी अभिषेकाने स्वच्छ केले.
आईचा क्षीणभाग जाण्याकरीता गरम पाणी, उटणे ,आयुर्वेदीक काढे, लोणी, दही, दूध, पाणी ,चंदन उटी, गुलाब जल वापरून स्नान घालण्यात आले. उपस्थित १०१ कुमारीकांसह भाविकांनी मुक्ताई च्या मूर्तीस लिंबू , साखर लावण्यात आले. पंचामृताने पवमान सुक्त व मंत्रोच्चारात अभिषेक सोहळा (Abhishek ceremony) पार पडला. तदनंतर आरती व महानैवेद्य देण्यात आला. या प्रक्षाळ पुजेनंतर आता आईसाहेबांचे दैनंदिन नित्यउपचार चालू होतील अशी माहिती ह भ प उध्दव महाराज जूनारे यांनी दिली.
यावेळी कोथळी मंदिर व्यवस्थापक ह.भ.प उध्दव महाराज जूनारे , ह.भ.प पंकज महाराज, ह.भ.प चेतन महाराज, ह.भ.प सौ दुर्गा संतोष मराठे, ह.भ.प. संजय महाराज(लालबाग) , ह.भ.प.संतोष महाराज चौधरी , नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे, गणेश आढाव आदींसह असंख्य भाविकांची उपस्थिती होती.
१०१ कुमारीकांनी लावले लिंबू साखर
येथे तिर्थक्षेत्र आदिशक्ती मुक्ताई आवारात झेंडुजी महाराज मठात मुलींचे बाल संस्कार शिबीर सुरू असून या शिबिरातील सुमारे १०१ कुमारिकांनी प्रक्षाळ पूजेत सहभागी होत आदिशक्ती मुक्ताईची सेवा केली आणि आदिशक्ती मुक्ताई च्या मूर्तीस लिंबू साखर लावले. यावेळेचे दृश्य पाहून जणू मुक्ताई च्या मैत्रिणींचीच उपस्थीती आहे की काय असे आनंद दायी दृश्य येथे दिसून आले.
प्रक्षाळ पूजेनंतर भाविकांसाठी महाप्रसाद
प्रक्षाळ पूजेनंतर आदिशक्ति मुक्ताई साहेबांना नैवेद्य दिल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद (Mahaprasad for devotees) व्यवस्था करण्यात आली होती.