असे आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे महिला उद्योजकता धोरण : महिला उद्योजकांनी द्यावे इकडे लक्ष

महिला धोरण अंमलबजावणीसाठी महिला समिती करणार राज्यभर दौरे
असे आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे 
महिला उद्योजकता धोरण : महिला उद्योजकांनी द्यावे इकडे लक्ष

जळगाव : jalgaon

महाराष्ट्र चेंबरच्या महिला धोरण (Women Entrepreneurship Policy) अंमलबजावणीसाठी महिला समितीने (Women's Committee) राज्यभर दौरे करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (Maharashtra Chamber of Commerce), इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (Industry and Agriculture) महिला उद्योजकता समितीच्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला.

सदरची बैठक (Meeting) महिला उद्योजक समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील (Chairperson Sangeeta Patil) यांच्या अध्यक्षतेखाली व को- चेअरपर्सन कविता देशमुख ,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य धनश्री हरदास यांच्या उपस्थितीत व महिला सदस्यांच्या उस्फुर्त प्रतिसादाने चेंबरच्या मुख्य कार्यालय ,मुंबई येथे संपन्न झाली. .

भविष्यातील होणारे उपक्रमांची माहिती होणे, राज्यस्तरीय महिला सदस्यांचा आपापसात परिचय होणे, तसेच आपल्या स्वतःच्या व आपल्या भागातील महिलांच्या व्यवसायात वाढ (Business growth) होणे या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून त्यानुसार भविष्यातील आराखडा तयार करता यावा या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व महिला सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कविता देशमुख ,धनश्री हरदास यांनी महिलांना मार्गदर्शन केले. संगीता पाटील यांनी महिला उद्योजक समितीच्या अंतर्गत आपल्या चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात आलेल्या महिला उद्योजकता धोरण (Women Entrepreneurship Policy) बाबतीत माहिती दिली. महाराष्ट्र चेंबरच्या अंतर्गत राज्यस्तरीय महिला विभागाबरोबरच चेंबरच्या सहा विभागात विभागीय महिला समिती (Women's Committee) कार्यान्वित करण्यात येणार आहेत जेणेकरून संपूर्ण राज्यभरात महिलांना चेंबरने तयार केलेल्या धोरणाचा लाभ घेता येईल.

प्रामुख्याने महिलांसाठी कौशल्य विकास (Skill development) प्रशिक्षण महाराष्ट्र चेंबरतर्फे उपलब्ध करून दिले जाईल. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, राज्य व केंद्र सरकारच्या योजना (Government schemes) या विषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र येत्या दोन वर्षात सुरू करण्यात येतील. महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी सर्व सुविधायुक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र महिला उत्पादन क्लस्टरची उभारणी केली जाईल.

महिलांची उत्पादने विक्रीसाठी (Sales of products) संपूर्ण राज्यात विक्री व प्रदर्शन केंद्र उभारले जातील. विविध बँकांबरोबर सकार्य करार करून महिलांसाठी प्रकल्प उभारणी कर्ज सवलतीच्या व्याजदरात उपलब्ध करून दिले जाईल.

महिला उत्पादन क्लस्टरर्स व विक्री व एक्झिबिशन सेंटर्स (Exhibition Centers) निर्मिती चा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला असून प्रथम नाशिक, नागपूर, लातूर ,सिंधुदुर्ग ,रायगड, पालघर व तसेच दुसऱ्या टप्प्यात जळगाव ,कोल्हापूर , सोलापूर , गडचिरोली, अकोला ,जालना या जिल्ह्यात केंद्राचा प्रारंभ केला जाईल.

उर्वरित सर्व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 2027 या चेंबरच्या शताब्दी वर्षापर्यंत (Century year) ही योजना पूर्ण करण्यात येईल ही माहिती देत असताना संगीता पाटील पुढे म्हणाल्यात राज्याच्या विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका असणार आहे या उद्देशाने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिला उद्योजक बनावेत म्हणून संपूर्ण राज्यभरात महिलांना प्रोत्साहित करणे तसेच त्यासंदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण ,कार्यशाळा (Training, workshops), सेमिनार याचे आयोजन करण्यात येणार आहे जेणेकरून महिलांना छोट्या आणि मध्यम उद्योग याबरोबर मोठ्या उद्योगातही सहभाग वाढावा यासाठी मदत करण्यात येईल.

तरी उद्योजक (Entrepreneur) बनू इच्छिणाऱ्या महिलांनाही या सर्व गोष्टींचा स्वतःसाठी फायदा करून घ्यावा असे आवाहन महिला उद्योजक समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी केले आहे. राज्यस्तरीय बैठक यशस्वीतेसाठी चेंबरचे जनरल सेक्रेटरी सागर नागरे , प्रियंका पांडे, नम्रता विरकर , सचिव विनी दत्ता, अविनाश पाठक यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.