'न्युट्रीशन" युक्त एलकी केळीचा तांदलवाडीत यशस्वी प्रयोग

एलकी केळीचा बंच दाखवताना महाजन बनानाचे डायरेक्टर प्रशांत महाजन (तांदलवाडी)
एलकी केळीचा बंच दाखवताना महाजन बनानाचे डायरेक्टर प्रशांत महाजन (तांदलवाडी)

रावेर|प्रतिनिधी Raver

औषधी गुणतत्वयुक्त असलेल्या एलकी (वेलची) केळीच्या (banana) लागवडीचा प्रयत्न तांदलवाडी येथील महाजन बनाना कंपनीचे डायरेक्टर कृषिभूषण प्रेमानंद महाजन (Director Krishibhushan Premanand Mahajan) व त्यांचे सहकारी प्रशांत महाजन यशस्वी झाला आहे. या प्रकारची केळी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने उत्पादकांना खूप आशा या व्हरायटी पासून आहे.

एलकी केळीचा बंच दाखवताना महाजन बनानाचे डायरेक्टर प्रशांत महाजन (तांदलवाडी)
एलकी केळीचा बंच दाखवताना महाजन बनानाचे डायरेक्टर प्रशांत महाजन (तांदलवाडी)
१५ वर्षापूर्वी टिश्यूकल्चर रोपांची लागवड केली जात नव्हती.कालांतराने यात वाढ झाली.आता टिश्युकल्चर सोबत औषधी गुणतत्व असलेली केळी लागवड करून वेगळा ठसा उमटवण्यासाठी नवीन व्हरायटी शोधून एलकि (वेलची) ही जात शोधून ४ हजार रोप लागवड केली.आणि हा प्रयत्न सफल ठरला.आगामी काळात केळीपासून विविध पदार्थ तयार केले जातात,त्यासाठी व्हरायटी देखील लागवड करण्याचा मानस आहे.
कृषीभूषण प्रेमानंद महाजन,तांदलवाडी ता.रावेर 

याबाबत केलेला हा प्रयत्न देशदूतशी बोलतांना उलगडला आहे कृषीभूषण प्रेमानंद महाजन यांनी,ते म्हणाले कि,देशात ११० प्रकारच्या केळी लागवडी केल्या जातात.दक्षिण भारतात अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत.

काही जाती संशोधनाने तर काही जाती विविध भागात आढळतात त्यांना साधारण भाषेत जंगली केळी संबोधित केले जाते.आपण जि-९ व्हरायटीपासून उत्पादन घेतो, मात्र दक्षिण भारतात खाण्यासाठी वेगळी,औषधीगुण तत्व युक्त केळी,डायबिटीज रूग्णांसाठी,बेबी फूड याकरिता वेगळी व्हरायटी घेतली जाते.केळी चिप्स करिता वेगवेगळ्या प्रकराचे उप्तादन घेतले जाते.

यात खासकरून केरळमध्ये केळी चिप्ससाठी नॅॅद्रण, रेड बनाना या व्हरायटी लागवड करतात.या अनेक व्हरायटीचा अभ्यास केल्यावर आम्ही दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली एलकी (वेलची) या केळीची आपल्या भागात लावगड करण्याचा निर्णय घेतला.दोन वर्ष याबाबत सखोल ज्ञान मिळवून,सदरील रोप मिळवून लागवड केली,आणि आनंद आहे कि,हि प्रजाती आपल्या मातीत सेट झाली.आता या एलकी केळीची कापणी होत आहे.५ हजार रुपये भावाने मुंबई पाठवली जात आहे.डॉक्टर्स,उद्योजक,सिलेब्रेटी यांना त्याबाबत अधिक माहिती असल्याने विशिष्ट वर्ग चवीने एलकी घेतात,आगामी काळात आणखी यात वाढ करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.हीच जात अटवाडे येथील विशाल अग्रवाल यांनी देखील लागवड केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com