माधवबागतर्फे मधुमेह आजारावर यशस्वी संशोधन

पत्रकार परिषदेत मुंबई येथील डॉ. राहूल मांडोळे यांची माहिती : संशोधन प्रबंध जगप्रसिध्द जर्नलमध्ये झाला प्रसिध्द
माधवबागतर्फे मधुमेह आजारावर यशस्वी संशोधन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

माधवबागच्या (Madhavbagh) डॉक्टरांनी (By the doctor) मधुमेह (diabetes) आजारावर संशोधन (research) केले होते. सप्टेंबर 2021 मध्ये माधवबागचा आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप 2 डायबेटीस मॅनेजमेंट हा संशोधन प्रबंध जगप्रसिध्द अशा जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाला आहे. माधवबागच्या या संशोधनामुळे आयुर्वेदिक पंचकर्म (Ayurvedic Panchakarma) पद्धतीने आता मधुमेह रिव्हर्स (Reverse diabetes) होऊ शकतो असे समोर आले असल्याची माहिती माधवबागचे मुंबई येथील रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट हेड (Research and Development Head) डॉ. राहुल मांडोळे (Dr. Rahul Mandole) यांनी मंगळवार, 9 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील पु.न.गाडगीळ ज्वेलर्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला डॉ. श्रध्दा महाजन,डॉ. श्रेयस महाजन, डॉ. प्रशांत याकुंडी, डॉ. अनंत नेरळकर, डॉ. अनिल कोरडे, अमित माळी आदी उपस्थित होते.

आयुर्वेदाविषयी असलेली शंका आणि डायबेटीस रुग्णांच्या मनात येणार्‍या या प्रश्नांची उत्तरं म्हणून आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबागचे संस्थापक व संचालक डॉ. रोहित माधव साने, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुदत्त अमीन, पेशंट एंगेजमेंट हेड डॉ. सुहास डावखर आणि रिसर्च न्ड डेव्हलपमेंट हेड डॉ.राहुल मंडोले यांनी सन 2018 मध्ये एकूण 82 टाईप 2 डायबेटीस रुग्णांच्या जीवनशैलीवर संशोधन केलं.

तीन महिने डाएट बॉक्स व डायबेटीस रिव्हर्सल पंचकर्म ट्रिटमेंट उपचार करण्यात आले. एकंदरीत या निरीक्षणाचा निष्कर्ष पाहता 92% रुग्ण हे वर्षभर कोणत्याही औषधांवर नसून सुद्धा त्यांची शुगर ही नॉर्मल आली म्हणजे ते रुग्ण नॉन डायबेटीक झाले होेते.

त्यामुळे या संशोधनामुळे मधुमेह आजार लवकरात लवकर बरा होवू शकतो, असे समोर आले असून ही मधुमेह रुग्णांना दिलासा देणारी बाब असल्याचेी यावेळी डॉ. राहूल मांडोळे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com