सातबारा उताऱ्यावर बोजा बसविण्यासाठी मागितली लाच

खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
सातबारा उताऱ्यावर बोजा बसविण्यासाठी मागितली लाच

पाचोरा - pachora

सातबारा उताऱ्यावर बोजा बसवण्याचे काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी एक हजार ३६० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी पंटरला जळगाव एसीबीच्या (acb) पथकाने आज अटक केली. भगवान दशरथ कुंभार (४४, बांबरुड ता.पाचोरा) असे अटकेतील संशयिताचे नाव असून ही कार्यवाही बांबरुड येथे संशयिताच्या घरी करण्यात आली.

सातबारा उताऱ्यावर बोजा बसविण्यासाठी मागितली लाच
धडक कारवाई ; विनापरवाना दोन लाख 38 हजारांचा खत साठा जप्त

लासगाव येथे तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शेती असुन त्यांनी एक लाख ३० हजार रुपये पिक कर्ज घेतले आहे. शेतीच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा लावण्यासाठीचे काम तलठ्याशी माझी ओळख आहे असे सांगत पाचोरा येथील कार्यालयातून करून देतो म्हणून भगवान दशरथ कुंभार यांनी तक्रारदारकडे एक हजार ३६० रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने जळगाव एसीबी कडे तक्रार नोंदवताच आज सापळा रचण्यात आला. आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बांबरुड येथे आरोपीच्या घराजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला.

सातबारा उताऱ्यावर बोजा बसविण्यासाठी मागितली लाच
धडक कारवाई ; विनापरवाना दोन लाख 38 हजारांचा खत साठा जप्त

हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात ,नाशिक अप्पर पोलीस आधीक्षक एन एस न्याहालदे,वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार नाशिक यांचे मार्गदर्शनात निरीक्षक श्रीमती. पीआय सँजोग बच्छाव, सहा. फौजदार दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील, सुनील पाटील,पो हे का रवींद्र घुगे,पो.ना. जनार्दन चौधरी,किशोर, सूनिल वानखेडे, बाळू मराठे,अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर महाजन, एन एन जाधव, पो.ना ईश्वर धनगर, राकेश दुसाने कार्यवाही पथकाने साफळा यशस्वी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com