परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी काही अभ्यासक्रमांना मुदतवाढ

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिकार मंडळाचा निर्णय
परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी 
काही अभ्यासक्रमांना मुदतवाढ
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

जळगाव jalgaon (प्रतिनीधी)

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या(Poet Bahinabai North Maharashtra University) डिसेंबर, २०२१ मध्ये होणाऱ्या (हिवाळी) परीक्षांकरिता (winter) exams) परीक्षा अर्ज सादर (Exam application submitted) करण्यासाठी काही अभ्यासक्रमांना मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे.

या परीक्षांसाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज ऑनलाईन भरून महाविद्यालयांनी/परिसंस्था/प्रशाळांनी परीक्षा शुल्क घेऊन विहित मुदतीत विद्यापीठात परीक्षा अर्ज सादर करण्याबाबत कळविलेले आहे. मात्र विविध घटकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने व कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या अभ्यासक्रमांना विलंब शुल्क विरहित परीक्षा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर देण्यात आली होती. ती आता ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. तर ५० रूपये विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्याची जी मुदत ३० नोव्हेंबर देण्यात आली होती ती आता विलंब शुल्कासह ३ डिसेंबर अशी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीची नोंद घेऊन परीक्षा अर्ज भरावेत. यापुर्वीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज व शुल्क महाविद्यालय/परिसंस्था/प्रशाळेत जमा केलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन इनवर्ड करून परीक्षा शुल्कासह विद्यापीठात जमा करण्याची कार्यवाही करावी.

विलंब व विशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर महाविद्यालयांनी अभ्यासक्रम व वर्गनिहाय ऑनलाईन इनवर्ड रिर्पोट एकत्रित प्रिंट काढून १५ दिवसांच्या आत विद्यापीठाच्या संबंधित विद्याशाखेत जमा करावे, असे आवाहन परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.किशोर पवार यांनी केले आहे.

ऑनलाईन परीक्षा अर्ज व शुल्क भरण्यासाठी https://nmuj.digitaluniversyty.ac वर उपलब्घ असलेल्या online Examination Form Submission या सुविधेद्वारे लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com