
जळगाव - jalgaon
स्पर्धेच्या (competition) युगात मागे राहू नये म्हणून विद्यार्थ्यांनी (students) सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये (Competitive examination) सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन जळगाव उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.संतोष चव्हाण (Dr. Santosh Chavan) यांनी व्यक्त केले. ते राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
(Poet Bahinabai Chaudhary) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (North Maharashtra University) जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे नेट, सेट आणि पेट परीक्षेच्या (Examination) पहिल्या पेपर करिता आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन दि.16 मार्च, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता जळगाव उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.अनिल चिकाटे आणि कार्यशाळेचे मुख्यसंयोजक विभागप्रमुख प्रा.डॉ.सुधीर भटकर उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.संतोष चव्हाण पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थांनी यशस्वी व चांगल्या जीवनमानासाठी स्पर्धा परीक्षेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला पाहिजे. तसेच तन-मनाने प्रयत्न केले पाहिजे तरच ते परीक्षेसोबतच जीवनातही यशस्वी होतील.
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लागणार आर्थिक खर्च ग्रामीण भागातील विद्यार्थी परिस्थितीमुळे देवू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेत ते यशस्वी होण्यासाठी अशा स्वरूपाच्या ऑनलाईन कार्यशाळा उपयुक्त असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ अनिल चिकाटे म्हणाले, व्यक्तिमत्त्व विकासात स्पर्धा परीक्षांचे विशेष महत्व आहे. नेट सेट आणि पेट या तिन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आकलनाचा स्तर तपासणाऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी आकलनाचा स्तर, वाचन क्षमता आणि अभ्यासातील सातत्य वाढविणे गरजेचे आहे.