
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला (Dr. Annasaheb G.D.Bendale Women's College) महाविद्यालयातील बिव्होक विभागामार्फत ब्युफा पेजेन्ट फॅशन शो (Fashion show) - 2023 आयोजित करण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्यच्या अमृत मोहत्सवानिमित्त फॅशन-शोमध्ये भारतीय पेहराव या तिरंगा थिंमच प्रमुख आकर्षण होते. यामध्ये शालेय विद्यर्थिनींपासून तर महाविद्यालयीन विद्यार्थिनी रॅम्पवर आपली कला दाखवली.
महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ स्किल डेव्हलपमेंट (कौशल्य विकास प्रशाळा) च्या ई-तेलच्या ब्युटी थेरेपी आणि फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनींनी मॉडेल्सचे ड्रेसेस आणि मेकअप केले होते. या फॅशन शो मध्ये एकूण 12 थीम घेण्यात आल्या होत्या.
यात लिटिल, हिरोज ऑफ अप रायझिंग, मूनचेकिंस, देस रंगीला, क्रियेटीव्ह, फैबरिक आर्ट, मरमेड, फ्यूजन आर्टिसट्री, फ्लोरल, स्नो क्वीन्स, ट्रायक्रोमॅटीक, महाराष्ट्रीयन रोब थिंम घेण्यात आल्या. यामध्ये 150 विद्यार्थिनींनी रॅम्पवर कला दाखवली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील फॅशन डिझायनिंग आणि ब्युटी थेरेपीच्या विद्यार्थिनींनी आपली कलाद्वारे मॉडेल सादर केल्या होत्या. मुंबई, पुण्याच्या तोडीस तोड असा फॅशन शो सादर करण्यात आला.
‘फॅशन शो’ चे यांनी केले परीक्षण
यावेळी प्रमुख परीक्षक म्हणून महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी आयोजिका विजया मानमोडे, महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी विजेता-2022 हर्षदा गायकवाड, अभिनेत्री प्रतीक्षा नरवाडे, मुशीष भालचंद्र ढाके, जागृती हेमंत यांनी काम पाहिले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लेवा एज्युकेशनल युनियन या संस्थेचे संचालक किरण बेंडाळे, प्रा.व.पु.होले, प्रा.एल.व्ही. बोरोले, आय.एम.आर.च्या संचालिका डॉ. शिल्पा बेडाळे उपस्थित होते.
यांचे लाभले मार्गदर्शन
संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शन तसेच प्राचार्य डॉ. गौरी राणे, समन्वयक, डॉ.शिला राजपूत,फॅशन डिझायनिंगच्या विभाग प्रमुख अनिता नांदेडकर, संतोषी बोरसे, ब्युटी थेरेपीचे विभाग प्रमुख रुपाली भोळे, रेश्मा नारखेडे, सायली कोल्हे आदींचे मार्गदर्शन लाभले. फोटोग्राफीकरिता विभागप्रमुख प्रा. राज गुंगे व टीम तसेच नोडल ऑफिसर पुष्कर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.