नशिराबादच्या या दोन विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते राज्य पुरस्काराने सन्मान

नशिराबादच्या या दोन विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते राज्य पुरस्काराने सन्मान

नशिराबाद, ता.जळगाव - jalgaon

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड (Maharashtra State India Scout Guide) संस्थेतर्फे नुकताच राज्यस्तरीय स्काऊट गाईड पुरस्कार (Scout Guide Award) प्रमाणपत्र नशिराबादच्या (New English School) न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील दोन विद्यार्थ्यांना दादर (मुंबई) येथे राज्यपालांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

नशिराबादच्या या दोन विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते राज्य पुरस्काराने सन्मान
करोना लसीकरणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

हा सोहळा नुकताच स्काऊट-गाईड पवेलियन दादर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे युवक कल्याण व (Sports Minister Sunil Kedar) क्रीडा मंत्री ना.सुनील केदार तसेच राज्यमंत्री ना.आदिती तटकरे (Minister of State Aditi Tatkare) तसेच स्काऊट गाईड संस्थेचे सचिव ओम प्रकाश बकोरिया उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातून सन 2019 2020 या वर्षासाठी न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद या शाळेतील कुमार गौरव रवींद्र मराठे व कुमारी श्रुती रतिलाल पाटील यांची प्रातिनिधिक स्वरूपात निवड होऊन त्यांना राज्यपालांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

नशिराबादच्या या दोन विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते राज्य पुरस्काराने सन्मान
शब्दाचीया मोल जाणू आता..

तसेच सन 2018-2019 या वर्षातील कुमार जगदीश सोनवणे( सरदार एस. के .पवार हायस्कूल नगरदेवळा) व कुमारी सिद्धी बडगुजर( ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव) यांनाही राज्यपालांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

काँटिजंट लीडर म्हणून न्यू इंग्लिश स्कूल नशिराबादचे पर्यवेक्षक बी.आर.खंडारे हे कार्यक्रमास उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षापासून कोविंड संसर्गजन्य आजाराच्या परिस्थितीमुळे हा पुरस्कार वितरित झालेला नव्हता.आता तो सन 2018-2019 व सन 2019- 20 या वर्षातील राज्य पुरस्कार परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यातून दोन विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार देण्यात आला. राज्यातून स्काऊट गाईडचे एकूण 145 विद्यार्थी विद्यार्थिनी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या या पुरस्कारांबद्दल जळगाव भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेचे चिटणीस बी.व्ही. पवार, स्काऊट जिल्हा संघटक बेलोरकर, गाईडच्या जिल्हा संघटक हेमा वानखेडे यांच्यासह नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जनार्दन माळी, कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव मधुकर चोबे, संचालक विनायक वाणी, मुख्याध्यापक सी. बी. अहिरे यांनी अभिनंदन केले आहे

Related Stories

No stories found.