विद्यार्थ्यांनी हाताळली प्रदर्शनात रायफल!

पोलीस स्थापना दिनामित्त शस्त्र प्रदर्शन
विद्यार्थ्यांनी हाताळली प्रदर्शनात रायफल!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्य पोलीस स्थापना (State Police Establishment) दिनानिमित्त मंगळवारी जिल्हा पोलीस दल, (District Police Force,) भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन (Bhanwarlal Kantabai Jain Foundation) व युवाशक्ती फाऊंडेशन (Yuvashakti Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्र, बिनतारी संदेश यंत्रणा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, पोलीस बॅण्ड पथकाचे प्रदर्शन (Performance) आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील 2 हजार 142 विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी (students) पिस्तुल पासून ए.के. 47 पर्यंतची शस्त्र हाताळून त्याबाबत माहिती जाणून घेतली.

प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10 वा. पोलीस अघिक्षक डॉ. प्रविण मुंढे व विद्यार्थी सात्विक भोंबे यांच्याहस्ते करण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून हे प्रदर्शन आयोजीत केले जात आहे. प्रदर्शनात आलेल्या विद्यार्थ्यांना पोलीसांनी देखील बेवारस वस्तू आणि सदृश्य वस्तूबाबत काय काळजी घ्यायला हवी याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी केले. यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया, सचिव अमित जगताप, पोलीस उप-अधिक्षक विठ्ठल ससे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, लिलाधर कानडे, रामदास वाकोडे, रामकृष्ण कुंभार, प्रतापराव शिकारे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस आरएसआय भरत चौधरी, मंगल पवार, एएसआय राजेश वाघ, देविदास वाघ, सोपान पाटील, हरीष कोळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमित माळी यांनी केले.

देशसेवेसाठी पोलिसांची नोकरी ही सुवर्णसंधी- डॉ. मुंढे

डॉ. मुंढे यांनी महाराष्ट्र पोलीसांचा इतिहास, कार्यपद्धती, प्रमुख उपलब्धी यावर सविस्तर माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना करिअर ची निवड करीत असताना पोलीस विभागाचा विचार प्रामुख्याने करावा असे आवाहन केले. देश सेवा करण्यासाठी पोलीसाची नोकरी सुवर्णसंधी असल्याचे सांगितले. सर्व शासकीय विभागांच्या पाठीशी पोलीस विभाग सदैव आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. विद्यार्थ्यांना पिस्टल, एस.एल.आर. रायफल, इन्सास, ए.के. 47, ग्लॉक, कार्बाईन, रिव्हॉल्व्हर, थ्री नॉट थ्री, पंप क्शन, टिअर गॅस या शस्त्रांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी श्वान पथकातील लॅबरेडॉर, जर्मन शेफर्ड, डॉबरमन ब्रीड चे श्वान उपस्थित होते.

2 हजार 142 विद्यार्थ्यांची भेट

या प्रदर्शनाला विद्या इंग्लीश मिडीयम स्कूल, भगिरथ शाळा, डॉ. अविनाश आचार्य शाळा, रूस्तमजी इंटरनॅशनल, उज्वल स्प्राऊटर इंटरनॅशनल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, भूषण सोनवणे, सयाजी जाधव, पियुष हसवाल, उमाकांत जाधव, भवानी अग्रवाल, अर्जून भारूळे, प्रशांत वाणी, सौरभ कुळकर्णी, सागर सोनवणे, भटू अग्रवाल, वेदांत दुसाने, संजना नाईक, संस्कृती नेवे, गायत्री कलाल, दिनेश पाटील, गोकूळ बारी, तेजस शिरूडे, संदिप सुर्यवंशी, सागर सोनवणे, प्रसन्न जाधव, अजय खरात यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com