
रावेर Raver |प्रतिनिधी–
जो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला न डगमगता सामोरे जातो आणि आपला भविष्यकाळ उज्वल करण्याचे ध्येय goal समोर ठेऊन सतत परिश्रम Hard work घेत असतो, तो नेहमीच एक आदर्श म्हणून जगासमोर येतो.शिक्षक Teacher हा समाज निर्माण करणारा कलाकार आहे.त्यांच्या मेहनतीने उद्याचे भविष्य घडत आहे. गुरुजनांचा सन्मान Respect for the Guru हा श्रेष्ठ सन्मान असल्याचे मत माजी खा.उल्हास पाटील Former MP Dr. Ulhas Patil यांनी व्यक्त केले.
येथील जिल्हा परिषद विवरे खुर्द शाळेचे मुख्याध्यापक हर्षवर्धन तायडे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.हर्षवर्धन तायडे यांनी 35 वर्ष 6 महिने प्रदिर्घ सेवा केली असून दि.३० नोव्हे रोजी ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्ताने रावेर तालुका शिक्षक मित्र परिवार यांच्यातर्फे सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन ग.गो.बेंडाळे हायस्कूल येथे करण्यात आले होते.
सुरूवातीला ईशस्तवन, स्वागतगीत होऊन प्रतिमेचे पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खा.डाँ.उल्हास पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून ग.गो.बेंडाळे हायस्कूलचे चेअरमन धनजी लढे,गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे व शा.पो.आ.अधिक्षक अजित तडवी,अधिव्याख्याता शैलेश पाटील होते.
प्रास्ताविक दिलीप पाटील यांनी केले तर मनोगत भुषण चौधरी,कल्पना पाटील,शैलेश राणे, अनिल सुरळकर यांनी व्यक्त केले. निरोपाला उत्तर देतांना हर्षवर्धन तायडे यांनी आपल्या सेवेत केलेला सर्व घटनाक्रमाचा लेखाजोखा मांडला. अध्यक्षीय भाषणात डॉ.उल्हास पाटील यांनी हर्षवर्धन तायडे सरांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून, गोदावरी आई व कै.बळिराम तायडे दादा यांच्या कौटुंबिक संबधाविषयी अनेक गोष्टींना उजाळा देवून श्री.तायडे यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी योगेश बाऱ्हे,रामचंद्र देशमुख, विजय कोल्हे, सुरेश इंगळे, गोपाळ भालेराव (कॅनरा बँक व्यवस्थापक), सुधाकर भालेराव, राजू बाऱ्हे, महेश पाटील, हबिब तडवी, दिपक सोनार, सौ.रूचा बाऱ्हे, विवरे बु.सरपंच युनुस तडवी, वासुदेव नरवाडे, विवरे खु. सरपंच स्वरा पाटील, कैलास भोलाणे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी ग.गो.बेंडाळे विद्यालयाचे चेअरमन व संचालक मंडळ, तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक,विवरे केंद्रातील सर्व शिक्षक, संघटनेचे सर्व पदाधिकारी,शिक्षक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वि.वा.पाटील व निलेश पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विजय कोल्हे यांनी मानले.