Accident एस.टी.बसच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी

अपघात | Accident
अपघात | Accident

मुक्ताईनगर - muktainagar

शहरात स्टेट बँकेजवळ (State Bank) एस.टी.बसने (s t bus) एका विद्यार्थीनीला (student) उडविल्याने ती जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आज सकाळी शहरातील स्टेट बँकेजवळ १२ वर्षाच्या मुलीस बसने धडक दिली. यात त्या मुलीच्या सायकलचा अगदी चक्काचूर झाला असून विद्यार्थीनी जखमी झाली आहे.

एमएच १४ बीटी ४१० या क्रमांकाची शेगाव ते नवापूर बस ही वेगाने जात असतांना ऋतुजा राजेंद्र कोल्हे या विद्यार्थीनीला बसने धडक दिली. यात सदर विद्यार्थीनीची सायकल पूर्णपणे चक्काचूर झाली असून ऋतुजा जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रूग्णालात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ऋतुजाला तात्काळ रूग्णालयात पाठविले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com