असे आहेत जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध

असे आहेत जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध

दिवसा जमाव बंदी तर रात्री संचारबंदी; पुन्हा शाळा बंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा नवीन व्हेरीयंट ओमीक्रॉन (Omicron) या विषाणूची लागण होणार्‍या रुग्णांमध्ये वाढ (Increase in patients) होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी (Collector)जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध (Strict restrictions) लागू केले आहे. यामध्ये सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत पाच पेक्षा जास्त जणांना एका ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली असून तर अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शाळा देखील बंद राहणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी दि. 10 रोजी रात्री 1 वाजेपासून लागू होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहे.

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमीक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने शासनाने शिथील केलेल्या निर्बंध पुन्हा लागू केले आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचे आदेश काढले असून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग व व्यसायासाठी निर्बंध घालून देण्यात आले आहे. हे आदेश 10 जानेवारी रोजी रात्री 1 वाजेपासून लागू होणार असून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कायम राहणार आहे. तसेच सकाळी 5 ते रात्री 11 वाजेनंतर सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींसाठी जमावबंदी तर रात्री 11 ते सकाळी 1 वाजेपयर्ंंत संचारबंदीचे आदेश देखील जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहे.

शासकीय, खासगी कार्यालयात परवानगी शिवाय प्रवेश नाही

शासकीय व खासगी कार्यालयात कार्यालय प्रमुखांच्या परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश राहणार नाही. प्रमुखांनी ऑनलाईन पद्धीने बैठका घेवून नागरिकांनी संवाद साधावा. कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या कामाचे सुसूत्रीकरण करुन आवश्यकतेनूसार वर्क फ्रॉम होम व शिफ्ट नुसार नियोजन करुन आपल्या कार्यालयात थर्मल गन, हँड सॅनिटायजरची व्यवस्था करावी. तसेच खासगी कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षा पेक्षा कर्मचारी असाणार नाही या पद्धतीने नियोजन करावे. रात्रीच्या वेळी कर्मचार्‍यांनी आपले ओळख पत्र सोबत बाळगावे. तसेच ज्यांनी लसीचे दोघ डोस घेतले आहे. त्यांनाच कार्यालयात काम करता येणार आहे.

लग्नासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 जणांना परवानगी

सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय किंवा मनोरंजनात्क कार्यक्रमांना 50 जणांची मुभा देण्यात आली आहे. तसेच लग्नसमारंभासाठी 50 जणांना परवानगी राहणार असून अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांनाच परवानगी असणार आहे. तसेच थिएटर्स व नाट्यगृहांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे.

शाळा बंद मात्र शिक्षकांचे दैनंदिन काम सुरु

जिल्ह्यातील शाळा दि. 15 फेब्रुवरी पर्यंत बंद राहणार आहे. मात्र इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून निश्चित केलेले उपक्रम सुरु राहतील. शिक्षकांना नेमून दिलेले दैनंदिन कामकाज सुरु राहणार असून शिक्षण विभाग, कौशल्य व उद्योजगता विभागा, उच्च तंत्र वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग व इतर विभागाने निश्चित केलेले उपक्रम सुरु राहणार आहे. मात्र त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाची पुर्व परवानगी आवश्यक राहणार आहे.

स्विमींग पूल, स्पा सेंटर पुर्णपणे बंद तर जीमला 50 टक्क्याची अट

स्वीमिंग पुल, स्पा व वेलनेस सेंटर, मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम, किल्ले, तिकीट विक्री करुन मनोरंजनात्मक सेवा दिले जाणारे कार्यक्रम हे पुर्णपणे बंद राहणार असून जीम या 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. मात्र याठिकाणी मास्कचा वापर अनवार्य राहणार आहे. तसेच जीममधील कर्मचारी व सेवा घेणार्‍या नागरिकांनी लस घेणार्‍यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

मास्क नाही तर प्रवेश नाही

जिल्ह्यातील ब्युटी पार्लर व सलून हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. याठिकाणी मास्कचा वापर आवश्यक राहणार असून दररोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील.

लसीचे डोस घेतलेल्यांनाच मिळणार प्रवेश

शॉपिंग मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स, रेस्ट्रॉरंट, खानावळ, हॉटेल हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. याठिकाणी व्यवस्थापकाने एकूण क्षमतेच्या उपस्थितांची संख्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे आवश्यक राहील. लसीचे दोघ डोस घेतलेल्यांनाच प्रवेश द्यावा लागणार असून होम डिलिव्हरीची सुविधा सुरु राहणार आहे.

72 तासांपुर्वीची चाचणीचा अहवाल लागणार निगेटिव्ह

आंतराष्ट्रीय व सार्वजनिक वाहतुकी नियमीत सुरु राहणार आहे. तसेच देशांतर्गत व राज्यांतर्गत वाहतुकीसाठी लसीचे दोघ डोस व 72 तासापुर्वी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल गरजेचा राहणार आहे. हे नियम सर्व स्तरावरील वाहतुकीसाठी लागू राहणार आहे.

पुर्व नियोजीत परीक्षा होणार

केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परिक्षांसाठी परिक्षेचे ओळख पत्र व प्रवेश पत्र प्रवासासाठी वैध राहतील. ज्या परिक्षांच्या तारखा निश्चित झत्तलेल्या आहेत त्या परीक्षा राज्य आत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाच्या मंजूरीनंतरच पार पाडल्या जातील.

...लसीचे डोस न घेतल्यास अस्थाना होणार बंद

सुविधा पुरविणार्‍या अस्थापना व याठिकाणी काम करणारे कर्मचारी यांनी कोविडच्या लसीचे दोघ डोस घेणे गरजेचे राहणार आहे. याठिकाणी निर्बंधांचे पालन न केल्याचे आढळून आल्यास अशा आस्थापना बंद करण्यात येतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com