जळगाव महापालिकेचा अजब कारभार...

  जळगाव महापालिकेचा अजब कारभार...

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहर महानगर पालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) विविध विभागातील कामांचा अजब व गजब कारभार (Strange administration) अनेक वेळा दिसून आला आहे. असाच काही प्रकार रामानंदनगर बस स्टॉप चौकात जलवाहिनीना वारंवार गळती लागत असल्याने दिड महिन्यात तब्बल सहाव्यांदा हा रस्ता एकाच ठिकाणी खोदण्यात आला आहे. तरी जलवाहिनी गळती सापडत नाही, गळती शोधता शोधता आणखी दुसरी जलवाहिनी फुटल्याचा प्रताप पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांनाकडून शनिवारी झाला.

जळगाव शहरात अमृत योजनेअंतर्गत नविन जलवाहिनीचे अंतिम टप्यात काम आहे. त्यात नविन व जून्या जलवाहिनीचे मोठ्या प्रमाणात आता जाळे तयार झाले आहे. त्यामुळे जलवाहिनीचे काम जेथे सुरू केले तेथे दुसर्‍या जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण मोठे वाढलेले आहे. जलवाहिनी गळती दुरुस्तीसाठी अनेक ठिकाणी डांबरीकरण केलेले रस्ते वारंवार खोदावे लागत असल्याने रस्त्यांचे दुरावस्था होत आहे. त्यात हा रस्ता धोकादाय झाल्याने येथे अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे.

गळतीमूळे पाण्याची नासाडी

रामानंदनगर बस स्टॉप येथे एकाच ठिकाणी वारंवार जलवाहिनीला गळती लागून हाजोरो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने कायम स्वरुपी जलवाहिनी दुरुस्तीच काम करावे अशी मागणी नागरिकांडून होत आहे.

गळती शोधायला गेले आणि काम वाढवले

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनी दुरूस्तीसाठी वारंवार खोदकाम होत आहे. त्यात शनिवारी पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी जेसीपी घेवून रामानंद नगर चौकात सकाळी जलवाहिनी गळती शोधण्यासाठी आले. व्हॉल सुरू करून जलवाहिनी जवळ खोदकाम करत असताना दुसर्‍या जलवाहिनीला जेसीपीचा धक्का लागला आणि ही जलवाहिनी फुटली. जलवाहीनी फुटताच पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले. व्हॉल बंद करून पाण्याचा उपसा करून फुटलेली जलवाहिनी जोडून पून्हा खड्डा बुजविण्यात आला. त्यामुळे ज्या गळतीचा शोध घेण्यासाठी पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आले होते ते न करताच दुसरी फुटलेली जलवाहिनीचे काम करून पून्हा कर्मार्‍यांना परतावे लागले.

रस्त्याच्या मध्यभागी खड्डे

रामानंद नगर बस स्टॉप चौकात गेल्या दिड महिन्यात तब्बल जलवाहिनी गळतीसाठी सहावेळा रस्त्याचे खोदकाम झाले. त्यामुळे या चौकात खड्डे, लहान मोठे दगड असल्याने चौकातून वाहनधारकांना जातांना जीवमुठीत घेवून जावे लागत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com