
रावेर | प्रतिनिधी raver
शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने झाल्याने, नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. अनेक घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहे, तर बहुतांशी ठिकाणी विजांच्या तारांवर झाडे उन्मळून पडल्याने विज पुरवठा खंडित झाला आहे.
गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळाला सुरुवात झाली. यात शहरात अनेक ठीक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने सावदा - रावेर व जुना सावदा रोड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. तर या वादळाने केळी बागा चे देखील प्रचंड नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. विज तारांवर झाडे पडल्याने संपूर्ण शहर अंधारात बुडाले आहे. तर तालुक्यात देखील वादळाने नुकसान झाल्याचा अंदाज आहे.