दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी कॅरिबॅगचा वापर बंद करा!

विक्रेते, व्यावसायिक, उत्पादकांना मनपा आयुक्तांची सूचना
दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी कॅरिबॅगचा वापर बंद करा!

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

मनपा प्रशासनातर्फे (Municipal administration) गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक निर्मूलन मोहीम (Plastic Elimination Campaign) राबविण्यात येत आहे. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर बंद (Carry Bag discontinued) करा, अशा सूचना मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांनी शहरातील विक्रेते, व्यावसायिक, उत्पादक यांना बैठकीत दिल्या.

मनपा प्रशासनाने प्लास्टिकमुक्त शहराचा (Plastic-free city) संकल्प केलेला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक विक्रेत्यांवर (Action against plastic sellers) कारवाई केली जात आहे. या कारवाई दरम्यान, महापालिकेचे पथक आणि विक्रेते यांच्यात वाद निर्माण होत असतात. हा वाद होवू नये किंवा याबाबतची माहिती व्हावी यासाठी शहरातील विक्रेते, व्यावसायिक, उत्पादक यांची मनपा आयुक्तांनी शुक्रवारी महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात बैठक घेतली.

यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारा श्री.चव्हाण, श्री. ठाकरे, अतिक्रमण विभागप्रमुख संजय ठाकूर, आरोग्य अधीक्षक उल्हास इंगळे, एल.बी.धांडे, एन.ई. लोखंडे, आरोग्य निरीक्षक जे.के.किरंगे उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्लास्टीक कॅरिबॅगसह कमी जाडीच्या वस्तुंचा वापर करु नये. अशा सूचना दिल्या. प्लास्टिकचा वापर केल्यास प्रशासनातर्फे कारवाई (Action) केली जाणार असल्याचा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे. दरम्यान, उपस्थित विक्रेत्यांनी प्लास्टिक बंदीच्या निर्बंधासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली. मात्र, विक्रेत्यांची मागणी आयुक्तांनी फेटाळून लावली. तसेच प्लास्टिकचा वापर करणार्‍यांविरुध्द कारवाईची मोहीम सातत्याने सुरुच राहिल, अशी तंबी देखील आयुक्तांनी यावेळी दिली.

यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री.चव्हाण व श्री. ठाकरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com