मॅनेजमेंट कोट्यातील घोडेबाजार थांबवाच!

खा.शि.चे संचालक कल्याण पाटील कडाडले; मॅनेजमेंट कोट्यातील ‘मॅनेज’वर टाकला प्रकाश
मॅनेजमेंट कोट्यातील घोडेबाजार थांबवाच!
USER

अमळनेर Amalner । प्रतिनिधी-

खान्देश एज्युकेशन सोसायटीने (Khandesh Education Society) जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून मॅनेजमेंट कोट्यातून (management quota!) अव्वाच्या सव्वा रुपये डोनेशन (taking a donation) घेऊन प्रवेश दिला जात आहे. यात खरे गुणवंत विद्यार्थी डावलले (Meritorious students left out) जात असून संस्थेचीही बदनामी (Defamation of the institution) होत आहे. त्यामुळे मॅनेजमेंट कोट्याचा घोडेबाजार (Stop the horse market) थांबवून त्या जागाही गुणवत्तेनुसार भरून संस्थेची होणारी बदनामी थांबवावी, अशी मागणी राज्यपाल (Governor) आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Kaviyatri Bahinabai Chaudhary North Maharashtra University) कुलगुरूंकडे (Chancellor)केली आहे, याची राज्यपालांनी दखल घेतली आहे, अशी माहिती खाशिचे संचालक कल्याण साहेबराव पाटील (Director Kalyan Sahebrao Patil) यांनी रविवारी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

खाशिचे संचालक कल्याण साहेबराव पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, स्व. प्रताप शेठ यांनी स्थानिक गोर गरीबांच्या मुलांना चांगले आणि उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले म्हणून खान्देश एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यामुळे या संस्थेचा लौकीक हा संपूर्ण राज्यभर पसरला आहे. पैशांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण हे संस्थेचे धोरण आहे.

मात्र खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप महाविद्यालय व उच्च महाविद्यालयामध्ये तिन्ही शाखांच्या 11 वी वर्गापासून ते एम.एससी, एम.ए., एम कॉम आणि डीफार्मसीमध्ये काही जागा या मॅनेजमेंट कोट्यातून भरल्या जातात. यासाठी सत्ताधारी संचालकांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून अव्वाच्या सव्वा रुपये घेऊन प्रवेश दिला जातो.

या मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश घेऊन इच्छेणार्‍या विद्यार्थ्यांच्या जागा या गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या मॅनेजमेंट कोट्यातील जागांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते.

यामुळे गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांपेक्षा 2-3 टक्के कमी गुण असलेल्या गरजू, गरीब व आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना पैशांअभावी या वर्गामध्ये प्रवेश मिळवता येत नाही. त्यामुळे अशा गरीब, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच असून गुणवत्ताही डावलली जात आहे. या शिक्षणाचा सुरू असलेल्या बाजाराबाबत कोणीही बोलायला तयार नाहीत.

तक्रारीची थेट राज्यपालांनी घेतली दखल

पुढे पत्रकार परिषदेत कल्याण पाटील यांनी सांगितले की, मॅनेजमेंट कोट्यातील इयत्ता 11 वी पासून ते एम.एससी, बी.सी.ए.,एम.ए., एम.कॉम पर्यंत असलेला मॅनेजमेंट कोट्यातील जागा रद्द करून त्या गरीब व गरजू आणि गुणवंताधारक विद्यार्थ्यांना देण्यात यावा, अशी मागणी आपण कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली होती. तसेच निवेदनाच्या प्रति या राज्यपाल, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांना पाठवल्या होत्या.

याची फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया, व राज्यपालांनी, दखल घेऊन त्यांचे अवर सचिव रा. शि. कदम यांनी खान्देश शिक्षण मंडळातील संचालकांचा मॅनेजमेंट प्रवेश कोटाच्या जागा रद्द करण्याबाबत कुलगुरूंनी आपल्या स्तरावर योग्य कार्यवाही करावी, असे पत्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com