नवीन पेन्शन योजना व रेल्वेचे खाजगी करण बंद करा

३१ रोजी एकदिवसीय बंद : ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोशिएशन
नवीन पेन्शन योजना व रेल्वेचे खाजगी करण बंद करा

भुसावळ (Bhusawal) (प्रतिनिधी) -

जुनी पेन्शन योजना ( old Penstion schime) लागू करने, रेल्वेचे खाजगी (train privatision) करण न करणे रिक्त पदांची भरती करण्यासह विविध मागण्यांसाठी देशभरात ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोशिएशनच्या (All india station master assocation) वतीने स्टेशन मास्तरांच्या समस्यांचा वाचा फोडण्यासाठी ३१ मे रोजी देशभरात एक दिवसीय बंदचे (one day strike) आयोजन करण्यात आले आहे.

३१ ऑक्टोबर पर्यंत असोशिएशनतर्फे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होणार आहेत. यासाठी ७ आक्टोबर रोजी देशभरातील ३५ हजार स्टेशन मास्तर आंदोलनात सहभागी होणार आहे.
असोशिएशच्यावतीने वेगवेगळ्या टप्प्यात आंदोलन करण्यात येणार आहे. काम बंद आंदोलनानंतर पहिल्या टप्प्यात एस्मा पदाधिकार्‍यांद्वारे रेल्वे बोर्ड अधिकार्‍यांना ईमेल पाठवून विरोध कारणे.

दुसर्‍या टप्प्यात १५ अक्टोबर रोजी रात्री ड्युटी शिफ्टमध्ये स्थानकावर मेणबत्ती पेटवून विरोध प्रदर्शन, २० ते २६ अक्टोबर दरम्यान एक सप्ताहात काळी फित लावून काम करणे.३१ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय उपोषण तर शेवटच्या टप्प्यात देशभरातील ३५ हजार स्टेशन मास्तर रेल्वे संचालन सुर ठेवून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनानंतरही मागण्यांबाबात विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. असोशिएशनच्या मागण्या - नाईट ड्युटी सीलिंग लिमिट ४३ हजार ६०० आदेश रद्द करुन १ जुलै २०१७ पासूनचे आदेश वापस घेणे. स्टेशन मास्तरांचे रिक्त पदांची तात्काळ भरती करणे. सुरक्षा व तणाव भत्ता मिळणे, एमसीपीचा लाभ १ जानेवारी २०१६ पासून मिळणे. पदनाम व केडरचे वर्गीकरण करणे. नवीन स्टेशन मास्तरांच्या स्टायपेंडच्या एरियर्स लवकर देणे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com