Photos # पूर्ववैमनस्यातून कंजरवाड्यात दगडफेक

पोलिसांच्या वाहनसह पाच दुचाकींचे नुकसान; पोलिसाकडून धरपकड सुरू
Photos # पूर्ववैमनस्यातून कंजरवाड्यात दगडफेक

जळगाव jalgaon

शहरातील कंजरवाडा (Kanjarwada) भागात जुन्या वादातून मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक (Stone throwing) झाल्याची घटना घडली. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनासह (police vehicle) चार ते पाच दुचाकींचे नुकसान (Damage) झाले आहे. या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी (police) वेळीच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

गेल्या महिन्यात राम नवमीच्या (Ram Navami) दिवशी सम्राट कॉलनीमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकी दरम्यान दिव्यकांत बागडे (Divyakant Bagade) या युवकाला लक्ष्मी नगरातील (Lakshmi Nagar) तीन ते चार तरूणांनी मारहाण (Beating) केली होती. त्यानंतर मुलाला का मारले याचा जाब विचारण्यास गेलेल्या दिव्यकांत याच्या आईला देखील तरूणांनी मारहाण (Beating) केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात (police) गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगरातील ते तरूण कंजरवाडा येथे दुचाकीने आले. त्यानंतर लक्ष्मीनगरातील तरूणांनी कंजरवाड्यातील तरूणांची वाद (Argument) घातला. वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाले. यात चार ते पाच दुचाकींची तोडफोड करून नुकसान करण्यात आले.

जमावाला रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

कंजरवाड्यात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात असलेले पोलीस कर्मचारी नाना तायडे व रमेश अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु जमाव अधिक आक्रमक असल्याने त्यांनी पोलिसांच्या वाहनावर (police vehicle) दगडफेक (Throwing stones) करण्यास सुरुवात केली. यात पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहेत. गेल्या महिन्यात तंबापुरा परिसरात याच वाहनाचे काही तरुणांनी दगड मारून नुकसान केले होते. दरम्यान आज पुन्हा याच वाहनावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले.

परिसरात तणावाचे वातावरण

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस, एसआरपीएफ, क्यूआरटीच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. नंतर जमावाला पिटाळून लावले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेमुळे कंजरवाडा परिसरात तणावाचे वातावरण (atmosphere of tension) निर्माण झाले होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू होते.

तगडा बंदोबस्त

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत एकाने कंजरवाड्यातील तरुणावर चॉपरने हल्ला केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच वादातून ही घटना घडल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळावरून नुकसानग्रस्त वाहने ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत कंजरवाडा भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त (Tight security) होता.

Related Stories

No stories found.