महापौरांच्या घरावर दगडफेक ; चौकशी सुरू

महापौरांच्या घरावर दगडफेक ; चौकशी सुरू

जळगाव - jalgaon

गणेश विसर्जनाची धामधुम सुरू असतांना रात्री उशीरा महापौर जयश्रीताई महाजन यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.

यात रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मेहरूणमधील महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली. यासोबत या टारगटांनी घरावर गुलाल देखील फेकली. तसेच, यावेळी फटाक्यांचे बॉब देखील फोडण्यात आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

हा सर्व गोंधळ घालून टारगट तरूण पळून गेले. महापौर जयश्री महाजन यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगावच्या प्रथम नागरिकाच्या सुरक्षेबाबत असे घडत असेल तर इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकरणी काही जणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com