
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
दिवसा दुचाकीवरुन टेहाळणी केल्यानंतर रात्रीच्या काळोखात दावणीला बांधलेल्या व रस्त्यावर मोकाट फिरणारे पशूधन चोरी (ivestock theft) करणार्या टोळीचा (gang) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (local crime branch team)पर्दाफाश (exposed) केला आहे.
चौकशीत सात संशयित आरोपी निष्पन्न केले असूनत्यापैकी मोहमंद फयाज मोहमंद अयाज (वय-24, रा. कसाईवाडा पाळधी ता. धरणगाव), वसीम मोहमंद अस्लम कुरेशी (रा. जकरिया मस्जिद मालेगाव, ह.मु. मासूमवाडी) व नईम शेख कलीम (रा. मासूमवाडी) या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून दोन महागडी वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध भागातून पशुधन चोरी होत असल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली होती. या घटना दिवसागणीक वाढत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना दिल्या होत्या.
त्यानुसार पथकाने संशयितांचा शोध घेत त्यांच्याबाबत माहिती काढणे सुरु होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना माहिती मिळाली की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मोहंमद फयाज मोहमंद अयाज हा या टोळीचा मास्टरमाईंड असून तो दि. 15 डिसेंबर रोजी त्याच्या (एमएच 12 बीव्ही 9415) क्रमांकाच्या स्कॉर्पीयो वाहनातून अजिंठा चौफुलीजवळ उभा होता. पथकाने त्याला वाहनासह ताब्यात घेतले. त्यानंतर संशयितांकडून (एमएच 20 बीसी 0752) क्रमांकाची वाहन जप्त केले आहे.
वाहनांना लावले होते आतून पडदे
चोरी करतांना चोरटे वाहनातील सर्व सीट काढून घेत त्यानंतर चोरी केलेले पशूधन यामध्ये ोंबून त्याची विल्हेवाट लावित होते. तसेच आत असलेले पशूधन दिसू नयेत म्हणून त्यांनी वाहनांना पडदे देखील लावले होते.
सातपैकी तिघे संशयित जेरबंद
संशयित चौकशीत संशयित मोहंमद फयाज मोहमंद अयाज याची कसून चौकशी केली असता, त्याने वसीम मोहमंद अयाज, नईम शेख कलीम, जाफर गुलाब नबी रा. कसाईवाडा पाळधी ता. धरणगाव, हारुन उर्फ बाली शहा, अरशद पुर्ण नाव माहित नाही रा. बारा फत्तर ता. जि. धुळे, मनोज उर्फ मोन्या विठ्ठल पाटील रा. सुरेशदादा जैन नगर कुसूंबा ता. जळगाव यांच्या मदतीने पशूधनाची चोरी केल्याची कबुली दिली. यातील मोहमंद फयाज मोहमंद अयाज, वसीम मोहमंद अस्लम कुरेशी व नईम शेख कलीम या तिघांना अटक केली असून उर्वरीत संशयितांच्या मागावर पथक रवाना झाले आहे.
जिल्ह्यात 18 तर पर जिल्ह्यात 4 गुन्हे दाखल
पशूधन चोरी करणार्या टोळीने जामनेर, भडगाव, अमळनेर, एरंडोल, पारोळा, चोपड, जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव या तालुक्यांसह इतर जिल्ह्यातून देखील पशूधनाची चोरी करीत त्याची विल्हेवाट लावली आहे. त्यांच्यावर जिल्ह्यात 18 तर इतर जिल्ह्यातील 4 असे एकूण 22 गुन्हे दाखल आहेत. अजून संशयितांची चौकशी सुरु असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. 19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई
चोरी केलेल्या पशूधनाची संशयितांकडून कशाप्रकारे विल्हेवाट लावण्यात आली याबाबतचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तसेच जिल्ह्यात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कारवाई देखील करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिला.
या पथकाने आवळल्या संशयितांच्या मुसक्या
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश चोभे, सफौ रवी नरवाडे, यूनूस शेख, पोहेकॉ संजय हिवरकर, राजेश मेंढे, अशरफ शेख, संदीप सावळे, संदीप पाटील, सुनिल दामोदरे, अकरम शेख, महेश महाजन, संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, उमेश गोसावी, हेमंत पाटील, लोकेश माळी, भारत पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील यांच्या पथकाने केली आहे.