ॲड.रोहिणी खडसे यांच्यावर कारवाई करा!

रावेर येथे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना दिले निवेदन
ॲड.रोहिणी खडसे यांच्यावर कारवाई करा!
पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना निवेदन देताना सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, राकेश घोरपडे व पिंटू माळी

रावेर|प्रतिनिधी raver

बोदवड (Bodwad) येथील नगरपंचायत निवडणुकीनंतर (Nagar Panchayat elections) महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी-शिवसेना (NCP-Shiv Sena) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याचे पडसाद आता मुक्ताईनगर (Muktainagar) येथे उमटू लागले असून, रावेरात देखील शिवसेनेकडून पोलिसात निवेदन देण्यात आले आहे.

यानिवेदनात आमदार चंद्रकांत पाटील यांना (Rohini Khadse) ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी चोप देऊ असे वक्तव्य केल्याचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आली आहे.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रल्‍हाद महाजन,युवा सेनेचे शहरप्रमुख राकेश घोरपडे,विभाग प्रमुख पिंटू माळी, शहर प्रमुख कुणाल बागरे, उपशहर प्रमुख गोपाल मिस्त्री,शाखाप्रमुख चेतन कदम उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com