बंजारा समाजाबद्दल खडसेंनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध ; मनसेने दिले पारोळा पोलीस स्टेशनला निवेदन

बंजारा समाजाबद्दल खडसेंनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध ; मनसेने दिले पारोळा पोलीस स्टेशनला निवेदन

पारोळा - प्रतिनिधी parola

माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी बंजारा समाजा (Banjara society) बाबत केलेल्या बेताल वक्तव्या बाबत पोलिस (police) निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत निवेदनात जामनेर येथील राष्ट्रवादीच्या सभेत असतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बंजारा समाजा बाबत आक्षेपार्ह विधान केले. यामुळे बंजारा समाजाच्या भावनांना दुखावल्या, तसेच राष्ट्रवादी हे वारंवार बहुजन समाजाला अपमानीत करण्या करीता त्यांचे प्रवक्त्यांना सांगतात व त्यांच्या प्रेरनेनेच सदर प्रवक्ते हे कार्य करत असल्याने सदर पक्ष व त्यांचे प्रवक्ते यांचा बंजारा समाज व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निशेष करत असल्याचे म्हटले आहे.

तरी त्यांनी चार दिवसात जाहीर माफी मागावी, तसे न केल्यास बजारा समाजातर्फे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे आंदोलन करण्यांत येईल असा इशाराही दिला.

याप्रसंगी जिल्हाउपअध्यक्ष प्रज्वल चव्हाण, तालुकाअध्यक्ष वसंत पवार, शहरअध्यक्ष छोटू लोहार, तालुका उपअध्यक्ष रवि पाटिल वाहतूक सेना दिलीप चव्हाण विद्यअर्थी सेना उपअध्यक्ष शरद वाघ, अध्यक्ष कमलेश चौधरी, हरीश राठोड, मयूर चौधरी, विनय चौधरी, शाम चौधरी, कुणाल चौधरी, अनिल पवार, बंजारा क्रांति दाल अध्यक्ष रतिलाल पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com