राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत उद्या जिल्ह्यात

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय  सामंत  उद्या जिल्ह्यात

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत (Higher and Technical Education Uday Samant) हे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. कवयित्री बहिणाबाईचौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जिल्हा ग्रंथालय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासह विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सकाळी 9 वाजता ना.सावंत याचे जळगाव विमानतळावर आगमन होईल.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडी अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्या सोडवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि.26 रोजी सकाळी 11.वाजता दीक्षांत सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नंदुरबार जिल्हयाचे पालकमंत्री के.सी.पाडवी, धुळे जिल्हयाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्रालयातील व संचालक कार्यालयातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठात बैठक झाली. या बैठकीत विविध 18 समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

असा आहे दौरा

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Uday Samant) हे दि. 26 रोजी सकाळी 7.45 वाजता मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता विमानाने जळगाव विमानतळ ( Jalgaon Airport) येथे आगमन. सकाळी 9.20 वाजता दिपस्तंभ फाऊंडेशन मनोबल संस्थेस सदिच्छा भेट, सकाळी 9.45 वाजता विष्णू भंगाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सकाळी 10.15 वाजता कवयित्री बहिणाबाईचौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, येथे आगमन दुपारी 2 वाजता स्व. रमेश डोंगरशिंदे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट स्थळ, दुपारी 2.15 वाजता युवासेनेच्या वतीने आयोजित युवासंवाद कार्यक्रमास जिल्हा नियोजन भवनात उपस्थिती, दुपारी 3 वाजता जिल्हा ग्रंथालय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती तर दुपारी 4.30 वाजता जळगाव विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com