राज्यस्तरीय सेट परीक्षेचे २६ सप्टेंबर रोजी आयोजन

राज्यस्तरीय सेट परीक्षेचे २६ सप्टेंबर रोजी आयोजन

जळगाव jalgaon

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, (Savitribai Phule Pune University,)पुणे यांचेमार्फत जळगाव केंद्रावर (Jalgaon Center) घेण्यात येणाऱ्या ३७ व्या राज्यस्तरीय सेट परीक्षेचे (State level set exams) आयोजन रविवार, दि.२६ सप्टेंबर रोजी करण्यात आले असून जळगाव केंद्रावर २६६५ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

या सेट परीक्षेचे आयोजन जळगाव शहरातील पुढील ०६ परीक्षा केंद्रावर करण्यात आले आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय परीसरातील स्वामी विवेकानंद भवन – अ (केंद्र सांकेतांक क्र. १४०१), स्वामी विवेकांनद भवन-ब ( केंद्र सांकेतांक क्र.१४०२), खान्देश एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च सेंटर (केंद्र सांकेतांक क्र.१४०३), खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (केंद्र सांकेतांक क्र.१४०४), के.सी.ई.चे शिक्षणशास्त्र महाविद्यालय (केंद्र सांकेतांक क्र.१४०५) आणि ॲङ सिताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती महाविद्यालय (केंद्र सांकेतांक क्र.१४०६).

सेट परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) हे setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यावर दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. त्याकरीता त्यांनी सेट परीक्षा अर्ज भरतांना वापरलेला लॉगिन व पासवर्डचा उपयोग करावा. प्रवेशपत्रावरील मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी कार्यवाही करावी.

प्रवेशपत्र डाऊनलोड करतांना काही अडचणी आल्यास डॉ.शा.रा.भादलीकर, प्रभारी कुलसचिव (Dr. Sha. Ra. Bhadalikar, Registrar in charge) तथा संपर्क व्यक्ती, सेट परीक्षा, जळगाव केंद्र यांचेशी भ्रमणध्वनी क्र.९४२३१८५०७२ किंवा ९४२३१८५०७५ वर संपर्क साधावा अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com