Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : काय डेंजर वारा सुटलाय! सशक्त संहिता, दमदार सादरीकरण

Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : काय डेंजर वारा सुटलाय! सशक्त संहिता, दमदार सादरीकरण

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असतांना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मात्र हजारो सज्जन पापभिरु माणसे किडया मुंगीसारखे आयुष्य जगत आहेत. स्वार्थी संवेदना बोथट झालेली माणसे बेकायदेशिरपणे साध्या सरळ पापभिरु असलेल्या विमा एजंट सत्यविजय दाभाडेचे हक्काचे घर बळकावताहेत या दुष्यचक्रात अमानुषपणे निष्पाप चाकरमान्यांचा सामान्य मध्यमवर्गीय माणसांचा हकनाक बळी जातोय हे दुष्टचक्र कधी थांबणार आहे की, दाभाडे सारखी माणस भ्रष्ट व्यवस्थेच्या ताटाखालचे मांजर होवून हताशपणे मरणाला जवळ करीतच असहाय्यपणे परिस्थितीचा बळी ठरणार आहे. असा सवाल करीत यावर सर्वांना अंतर्मुख करुन विचार करायला लावणारे नाटक म्हणजे रात्री छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रात्री सादर झालेले राखुंडेनगर चाळीसगावचे काय डेंजर वारा सुटलाय हे मराठी रंगभूमीवर महत्वपूर्ण योगदान देणारे प्रयोगशिल लेखक जयंत पवार लिखित आणि मेहनती रंगकर्मी महेंद्र खेडकर दिग्दर्शित दोन अंकी मराठी नाटक\

खास जयंत पवार स्टाईलचे नाटक त्यामुळे सशक्त संहिता आलीच त्यावर दिग्दर्शक महेंद्र खेडकरांनी जातकूळ ओळखून केलेले दिग्दर्शिय संस्कार सोबत एकूण बावीस कलावंतांचे टीमवर्क तंत्रज्ञानाची चमकदार कामगिरी या बलस्थानांमुळे एका सशक्त संहितेचे दमदार, सादरीकरण झाले आणि ज्वलंत सामाजिक समस्येवर प्रकाशझोत टाकणारे रसिकांना रंजना सोबतच अंजन घालणारे हे नाटक निश्चितच रसिकांच्या चर्चेचा विषय ठरले. असो!

अभिनयाच्या बाबतीत चंद्रकांत चौधरी (दाभाडे), कांचन अटाळे (बायको), पियुष चौधरी (बंटी), सानिका नावरकर (चिंगी), सोनल चौधरी (निवेदन), किरण हिरोडे (मेल अँकर), चंचल धांडे (फिमेल अँकर), पंकज बारी (बबन यलमाने), पवन बारी (इन्स्पेक्अर), ऋषिवेद सोनवणे, तेजस राणे (पुरुष), श्रीनंद येलनामे (मुन्ना/ड्रायव्हर), देवयानी पाटील (स्त्री), सतीश सुर्वे (डॉक्टर), पुष्कर सोनार, यश गोडसे, राजेश पाटील (हवालदार), शितल जोशी (देशपांडे), जगदिश गंगावणे (गृहस्थ), पृथ्वीराज सोनवणे (चाफळकर), अरुण माळी (गुप्ते), संजय चव्हाण (पुसाळकर) यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला. काही कलावंतांनी मात्र चोख पाठांतर करायला हवे होते. म्हणजे सादरीकरणाची लय व गती पहिल्या अंकात सांभाळता आली असती.

तांत्रिक बाबतीत राहुल निंबाळकर (प्रकाश योजना), दिशा ठाकूर (संगित), सुदर्शन पाटील (नेपथ्य), मनोहर ठाकूर (पार्श्वसंगित), सोनाली चौधरी (वेशभूषा), धनवीर सिंग ठाकूर (रंगभूषा) या तंत्रज्ञांची कामगिरी परिणामकारक राहुल सोनवणे, अनिल चोपडे, प्रकाश पाटील, डॉ.साहेब पडलवार, गौरव सूर्यवंशी, गायक पंकज बारी आणि सचिन महाजन यांचे योगदान महत्वाचे.

थोडक्यात अलिकडच्या स्पर्धेच्या काळात एकाच दिवशी दोन नाट्यप्रयोग सादर करावी लागली काय डेंजर वारा सुटलाय या नाटकाच्या दरम्यान समर्पक गाणी सांधिक हालचाली, प्रतिकात्मक फॉरमेटन्स बघायला मिळाली. त्यामुळे सशक्त संहितेचे दमदार सादरीकरण झाले. इतकेच!

आजचे नाटक एक रोझ कलरवोब मल्टीपर्पज फाऊंडेशन, जळगाव

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com