Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : कणखर ‘स्त्री’ ची अपरिचित पण प्रेरणादायी कहाणी ‘रतन’

 Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : कणखर ‘स्त्री’ ची अपरिचित पण प्रेरणादायी कहाणी ‘रतन’

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सारेच गेले वर्षभर उत्साहात साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने देशभर विविध उपक्रम-कार्यक्रम आयोजित करुन शहीदांना वंदन करुन श्रध्दांजली वाहीली जात आहे. स्वातंत्र्याच्या या धगधगत्या अग्निकुंडात अनेक शुर वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तर जालीयनवाला बाग हत्याकांडात कु्रर, निदर्यी ब्रिटीशांनी केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप अबालवृध्दांचा हकनाक बळी गेला आहे. याच हत्याकांडाचा अपरिचीत कहाणी आणि इतिहासात घडलेल्या वास्तवतेचा शोध घेण्याचा मनस्वी प्रत्यन म्हणजे रात्री हौशी राज्य नाट्य महोत्सव प्राथमिक फेरीच्या दरम्यान, रात्री सादर झालेले प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे लिखीत आणि प्रा.सुचित्रा लोंढे दिग्दर्शित रतन हे दोन अंकी नाटक होय.

प्रस्तुत नाट्य प्रयोग जळगावच्या डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाने सादर केला होता. सादरीकरणाचा एकूण परिणाम लक्षात घेता जालीयनवाला हत्याकांडाच्या पार्श्वभूमिवर आपला पती शहीद झाल्यावर ब्रिटीशांनी देवू केलेली मदत देशप्रेमापोटी नाकारणारी आणि स्वतःला देशाप्रती समर्पित करणार्‍या रतनदेवी ची अपरिचित परंतू वास्तववादी काहीणी पहिल्या अंकातील काही पात्रांचा विसराळूपणामुळे काहीशी लय संथ झाल्यामुळे पकड सैल झालेली परंतू, दुसर्‍या अंकात मात्र वेगवान घटनाक्रम आणि सादरीकरणावर असलेली पकड मजबूत झाल्यामुळे तसेच कलावंत आणि तंत्रज्ञानाच्या कामगिरीमुळे अपरिचित कहाणी दडलेल्या वास्तवतेचा शोध अखेर प्रेरणादायी झाली असो!

 Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : कणखर ‘स्त्री’ ची अपरिचित पण प्रेरणादायी कहाणी ‘रतन’
VISUAL STORY : शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

खरंतरं जालीयनवाला बाग घटनेवर आधारीत असलेल्या कणखर देशभक्त स्त्री विरांगणेची ही अपरिचित काहाणी आहे. म्हणजेच रतनदेवी (सुचित्रा लोंढे) ची आपण केलेल्या कृत्याचे पापक्षालन करण्यासाठी ब्रिटीश सरकारने जालीयनवाला बागेत शहीद झालेल्यांच्या कुटूंबियांना आणि जखमींना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दिले. धूर्त गोर्‍यांचा अंतस्थ हेतू साक्ष बदलने हा होता परंतू, स्वाभीमानी रतन देवी व अत्तर कौर या दोन स्त्रिया ते पैसे घेण्यास कणखरपणे नकार देतात. पतीच्या वीरमरणानंतर देखील या धीरोदत्तपणे रतनदेवी समर्पित भावनेने कृती करते तिच्या हुंदक्यांचा हुंकार बनतो आणि एका शुर विरांगणेची काहाणी या ठिकाणी संपते. शिवाय लेखक प्रा.जयंत लेकुरवाळे या हत्याकांडाच्या मागची कारणे देखील शोधण्याचा प्रयत्न करतात. काही प्रसंगातून मांडणी काहीशी शब्द आणि पसरट असलीतरी एकूणच सादरीकरण मात्र निश्चितच प्रेरणादायी ठरले.

आता अभिनयाच्या बाबतीत मध्यवर्ती भूमिकेत स्वतः दिग्दर्शिका असलेल्या प्रा.सुचित्रा लोंढेंनी विविध भावछटा दाखविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. त्यांना सहभूमिकांमध्ये सर्वश्री मयूर पाटील (छज्जू) जयंत नेवे (बाऊजी), डॉ.सविता नंदनवार (माहाजी), डॉ.जयंत लेकुरवाळे (राजींदर), प्रियंका आढे (परमिंदर कौर), नीता वाल्हे (रज्जो), ऐश्वर्या जोशी (कम्मो), दिपक पवार (सुंदरदास), डॉ.अंकीता दुवे (इंग्रज महिला), विशाल पाटील (उधमसिंग), यामिनी सोनवणे, भूमिका राजपूत, पायल कोळी, वैष्णवी पाटील (मैत्रिणी), जय सोनार, लोकेश भांडारकर, चिराग भालेराव (वृध्द), प्रा.अनिल बेलसरे, भावेश तायडे, योगेश गायकवाड (पोलीस) तसेच बालकलावंत तनिष्क आहेर (छोटा सरदार) यांच्या भूमिका स्कोपच्या मानाने चांगल्यापैकी, तांत्रिक बाबतीत दिग्दर्शक प्रा.सुचित्रा लोंढेंचा प्रयत्न स्तुत्य (कलावंतांकडून चोख पाठांतराची अपेक्षा), निखिल शिंदे (प्रकाश योजना), गायत्री सोनार (पार्श्वसंगित), भाग्यश्री अमृतकर (नेपत्थ), रुपाली भोळे (रंगभूषा), अनिता नांदेडकर (वेषभूषा), डॉ.विनोद नन्नवरे, डॉ.सचिन कुंभार, प्रा.संतोष सोनवणे, शांताराम पाटील यांचे तांत्रिक सहाय्य यथायोग्य निर्मिती प्रमुख प्राचार्य डॉ.गौरी राणे यांचेसह प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, डॉ.विलास पाटील, डॉ.प्रमोद तायडे, प्रा.शिरीष झोपे, राकेश वाणी, प्रा.राज गुंगे यांचे योगदान महत्वाचे. थोडक्यात समस्त कलावंतांनी परिश्रमपुर्वक सादर केलेली एका कणखर स्त्रीची अपरिचित कहाणी प्रेरणादायी ठरली हे निश्चित!

आजचे नाटक मुसक्या कै.शंकरराव काळुंखे चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com