
चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी
शहरातील खरजई नाक्या जवळील स्टेट बॅक ऑफ इंडियाचे १७ लाख रुपये असलेले एटीएम मशीन रात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडली आहे.
घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून ते पंचनमा करीत आहे. दरम्यान चोरट्यांनी चारचाकी वाहनातून एटीएम मशीन चोरुन नेल्याने पोलीस चारचाकी वाहनाबाबत काही सुगावा लागतो यादृष्टीने तपास करीत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उपविभागीय आधिकारी कैलास गंवाडे, पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, एपीआ विशाल टंकले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.